भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : देशभक्ती ही केवळ घोषणांमध्ये किंवा एका दिवसाचा उत्सवात मर्यादित न राहता ते विद्यार्थ्यांच्या आचरणातून आणि दैनंदिन जीवनातून दिसून आली पाहिजे. विद्यार्थ्यांना आपली कला दाखवण्यासाठी व्यासपीठाची गरज असते. आणि ते व्यासपीठ जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद भंडारा प्राथमिक विभागाने उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी, शिस्त, एकात्मता, संवेदनशीलता व देशसेवेची भावना निर्माण करण्यासाठीच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते,असे विचार शिक्षणाधिकारी प्राथमिक निर्मला माने यांनी केले. जिल्हा परिषद भंडारा शिक्षण विभाग प्राथमिक अंतर्गत देशभक्तीपर आधारित स्वातंत्र्य दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी प्राथमिक निर्मला माने यांनी केले. भंडारा शहरातील १७ शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक संदेश देणारे विविध कलाविष्कार सादर केले.
यामध्ये विद्यार्थ्यांनी पथनाट्य, समूहगीत आणि समनृत्य त्यांच्या माध्यमातून स्वतंत्र्याचा इतिहास देशाप्रती कर्तव्य राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी तसेच पर्यावरण व मोबाईलच्या अतिवापरासारख्या विविध सामाजिक विषयावर प्रभावी संदेश दिला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संगीत भावना, नेतृत्व गुणआणि देश प्रेमाची भावना अधिक दृढ झाली. १७ शाळांच्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सादर केलेल्या विविध कलाविष्कारामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले. सर्व विद्यार्थ्यांच्या उत्साह वाढविण्यासाठी प्रोत्साहनपर ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्य या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी रवींद्र सोनटक्के शिक्षणाधिकारी माध्यमिक, मनीषा गजभिये, उपशिक्षणाधिकारी, राहुल बाबा, उपशिक्षणाधिकारी, झाल्टे साहेब उपशिक्षणाधिकारी, मोहन उशिरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भंडारा, देवानंद घरत प्रभारी विस्तार अधिकारी, गौतम बोरकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लता धखाते विस्तार अधिकारी यांनी केले, तर कार्यक्रमाचे संचालन महेश जगनिक आभार प्रदर्शन प्रकाश राखडे यांनी केले. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.