२५.४३० किलो गांझासह, दोघे ताब्यात

अमली पदार्थ विरोधी पथक नागपूरची पालांदूर येथे धडक कारवाई

भंडारा पत्रिका / पालांदूर : ओडिशा-भंडारा-नागपूर मार्गावरून मालवाहु वाहनातून गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थ विरोधी कृती दल, नागपूर यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे नागपूरचे अमली पदार्थ विरोधी पथक भंडारा येथे रवाना करण्यात आले. पथकाने दि.२३ सप्टेंबर रोजी (बुधवार) पहाटे लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे संशयित मालवाहू वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये २५.४३० किलो गांजा आढळून आला.

जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत १२ लाख ७१ हजार ५०० रुपये असून सह वाहनासह जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ३२ लाख १६ हजार ७०० रुपये आहे.

या प्रकरणी पथकाने गुलाम याजिद गुलाम वजीर, रा. महाकाली नगर, झिंगाबाई टाकळी, मानकापूर, नागपूर व वाहन चालक शेख शाहबाज शेख सरवर रा. कपिल नगर, नागपूर यांना अटक केली असून पोलीस ठाणे पालांदूर येथे गुन्हा क्रमांक २४६/२०२६, कलम ८(क), २०(ब)(२)(क), २९ अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा १९८५ अन्वेये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नागपूर येथील अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस करीत आहेत.

पोलिसांनी ही कारवाई महाराष्ट्र अमली पदार्थ विरोधी कृती दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती ज्योतीप्रिया सिंह, पोलीस उपमहानिरीक्षक प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अमली पदार्थ विरोधी कृती दल नागपूरचे पोलीस अधीक्षक अजित टिके यांच्या निर्देशानुसार, पोलीस निरीक्षक नंदकुमार केंजोळे यांच्या नेतृयात सहायक पोलीस निरीक्षक कोळ्येकर, पोलीस उपनिरीक्षक टिपुर्णे,सहायक पोलीस उपनिरीक्षक कडू व अमली पदार्थ विरोधी कृती दल नागपूर पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *