प्रवेशोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा व यशाचा दिवस- सौ.कविता उईके

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मुलांना शाळेत येण्याची आवड असते. अंगणवाडी पासूनच विद्यार्थी प्राथमिक शाळेत जाण्यास उत्सुक असतात. इयत्ता पहिलीच्या प्रवेशा संबंधी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. जेणेकरून विद्यार्थ्याला शाळेविषयी आवड निर्माण होईल. आणि विद्यार्थी आनंदाने शाळेत येईल याच भावनेने प्रवेशोत्सव सर्व शाळांमध्ये राबविण्यात येते. प्रवेशोत्सवाच्या दिवशीच समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक, बूट पायमोजे वाटप केले जात आहेत. मध्यान भोजनामध्ये गोड जेवणाचा समावेश, पहिलीतील प्रवेशामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत होत आहे. त्यामुळे प्रवेशोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा आणि यशाचा दिवस आहे असे प्रतिपादन सौ.कविता उईके अध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावणवाडी केंद्र वाकेश्वर येथे प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रवेशोत्सवानिमित्त नवागत विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. कविता उईके याच्या हस्ते प्रवेशद्वारावर औक्षण करून प्रेमपूर्वक पाय धुवून त्यांचे सन्मानपूर्वक व उत्साह पूर्ण वातावरणात शाळेत स्वागत करण्यात आले भारतीय संस्कृतीतील अतिथी देवो भव या परंपरेच्या सन्मानराखत विद्यार्थ्यांना आपुलकी आदर आणि मायेची अनुभूती देत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची मंगल सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी डॉक्टर येलमल वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला यांनी विद्यार्थ्यांना मार्मिक असे मार्गदर्शन केले. प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी मिळत असलेल्या सवलतीचा फायदा घेऊन आपला जीवन उज्वल करावा व उच्च शिक्षण घ्यावा असे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

सर्व विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश, पाठ्यपुस्तक, बूट पायमोजेचे वाटप करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी ओमकांता पंधरे प्रशासक ग्रामपंचायत, पुष्पा उईके अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, रजनीताई मस्के, ईश्वर मस्के, देवेंद्र भोंगाडे, यादवराव कुथे, शालिक लुटे ग्रामपंचायत अधिकारी, मेघा फेंडर,अनिल कानतोडे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश जगनिक मुख्याध्यापक यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगत मधून शाळेत राबविण्यात येणारे उपक्रम, विविध शिष्यवृत्ती व योजनांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळा नेहमी प्रयत्नशीलराहील. आपल्या मनोगता मधून व्यक्त केले. ज्या पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत दाखल केलेले आहेत त्या पालकांचे सुद्धा स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन दिशा केदार शिक्षक यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सविता मस्के अंगणवाडी सेविका, सीता लोखंडे, सत्यभामा वाढवे यांनी सहकार्य केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *