७ वर्षाच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांचा प्राणघातक हल्ला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया शहरात बेवारस मोकाट कुत्र्यांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळी शाळेत जाण्यासाठी घरासमोर उभ्या असलेल्या एका निष्पाप मुलीवर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शहरातील प्रभाग क्र. ४ मध्ये घडली आहे. या घटनेमुळे शहरभर भीतीचे वातावरण पसरले आहे. गोंदिया शहरातील प्रभाग क्र. ४, रिंग रोडवरील मजारच्या मागे असलेल्या एका घरात ७ वर्षाची एक मुलगी सकाळी शाळेत जाण्याची तयारी करून घरासमोर उभी होती. याचवेळी परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या एका कळपाने तिच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी किरकोळ जखमी झाली. मुलीने भीतीने आरडाओरडा केल्यावर शेजारची एक महिला धावून आली आणि तिने कसेतरी कुत्र्यांना पळवून लावले. त्यामुळे मुलीचा जीव थोडक्यात बचावला. मात्र या धक्कादायक घटनेमुळे मुलीची प्रकृती खालावली. त्यानंतर मुलीला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलगी आता धोक्याबाहेर आहे.

शहरात मोकाट कुत्र्यांची वाढती दहशत ही घटना एकटी नसून गोंदिया शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शहराच्या सर्वच भागांमध्ये असे प्रकार वारंवार घडत आहेत. वाहनचालक दुचाकीवरून जात असताना कुत्रे अचानक समोर येतात पादचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना चावण्याच्या घटना घरासमोर खेळणारी लहान मुले असुरक्षा शाळकरी मुले सकाळी आणि संध्याकाळी घाबरून शाळेत जातात या सर्व प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोकाट कुत्र्यांची मोठी भीती पसरली आहे. नागरिकांची मागणी स्थानिक नागरिकांनी न.पा. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही मोकाट कुत्र्यांना पकडणे, निर्बीजीकरण आणि लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबवली जात नसल्याचा आरोप केला आहे. “रोज सकाळी मुले शाळेत जाताना भीती वाटते. पालकांना जीव मुठीत घेऊन मुलांना सोडावे लागते. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात” अशी मागणी नागरिक करत आहेत. या घटनेनंतर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने शहरातील मोकाट कुत्र्यांबाबत ठोस पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *