भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गायत्री शक्तिपीठ, भंडा- रा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला गुरुपूजन, पंचकुंडीय गायत्री महायज्ञ व प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात गायत्री परिवाराचे शेकडो साधक, परिजन व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य वेदमूर्ती तपोनिष्ठ पं. श्रीराम शर्मा आचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर पंचकुंडीय गायत्री महायज्ञ संपन्न झाला. विश्वशांती, पर्यावरण संरक्षण, सुसंस्कार, कुटुंबकल्याण व मानवतेच्या मंगलकामनेसाठी सामूहिक आहुती अर्पण करण्यात आल्या. यावेळी गायत्री शक्तिपीठ, भंडारा (महाराष्ट्र) चे अध्यक्ष श्री. मुकुंद भैरम यांनी गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व विशद करताना, “गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नसून जीवनाला दिशा देणारी दिव्य चेतना आहे. आपण केवळ निमित्तमात्र असतो; कार्य घडवून आणणारी खरी शक्ती ही गुरुची असते,” असे प्रतिपादन केले.
आपल्या प्रदीर्घ सेवाप्रवासातील अनुभव कथन करताना त्यांनी गायत्री शक्तिपीठ, भंडारा, प्रज्ञापीठ गणेशपूर, गायत्री मंदिर शिलेगावसह विविध ठिकाणी गायत्री मंदिरे व शक्तिपीठांच्या उभारणीची प्रेरणा आणि सामर्थ्य गुरुचरणांतूनच प्राप्त झाल्याचे सांगितले. शासकीय सेवेतून निवृत्तीनंतर हरिद्वार येथून गोवा येथे गायत्री परिवाराच्या प्रचार-प्रसारासाठी सेवा करण्याची संधी मिळाल्याचे सांगताना त्यांनी तेथील अनेक प्रेरणादायी अनुभव उपस्थितांसमोर मांडले. गुरुशक्तीवर अढळ श्रद्धा, समर्पण आणि सेवाभाव असेल तर अशक्य वाटणारी कायेर्ही सहज शक्य होतात, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमास गायत्री परिवार ट्रस्टचे उपाध्यक्ष मोरेश्वर तिडके, सौ. ज्योती नागरिकर, कोषाध्यक्ष सुरेंद्र सेलोकर, सौ. कलावती कुंभारे, सौ. अश्विनी भाजीपाले, जिला युवा समन्वयक चेतन भैरम, प्रकाश धात्रक,मनिष शहारे,सौरभ दिवटे ,दशरथ बोरकर, अतुल वर्मा,दिपचंद आगरे, देविदास लांजेवार,श्रीराम सिंगनजुडे, जितेश वैद्य ,,सुरेश शहारे, मनोहर शहारे,धनराज साठवणे, केशव नागरिकर, प्रेमनाथ चांदेवार,हर किशोर दिवटे, श्रीमती .विना शहारे, मिराबाई सोनवाने, वृंदा बडवाईक,मेघा नारायणपुरे, संगिता सपाटे,ललीता राऊत, अल्का वंजारी,शंकुतला बडवाईक, धनराज हटवार यांच्यासह गायत्री परिवाराचे अनेक परिजन, साधक व भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गायत्री परिवार ट्रस्ट, भंडारा यांच्या वतीने करण्यात आले. परिव्राजक संदीप साठवणे यांनी कार्यक्रमाचे प्रभावी संचालन केले, तर सौरभ दिवटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी, महिला मंडळ, युवा प्रकोष्ठ व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर उपस्थितांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.