लोटन पोहामिल चौक मार्गावरील बंद एसटी बससेवा तात्काळ सुरू करा

मोरेश्वर बिसने/ भंडारा पत्रिका तुमसर: साकोली, गोंदिया, मुंढरी, करडी , तिरोडा तसेच परिसरातील गावांना जोडणारी लोटन पोहामिल चौक मार्गावरील बंद करण्यात आलेली एसटी बससेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे भंडारा जिल्हा सचिव मेहताबसिंग ठाकूर यांनी तुमसर आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, या मार्गावरील एसटी बससेवा मागील काही दिवसांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी व कामगारांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. शिक्षण, रोजगार, शासकीय कामे, बाजारपेठ तसेच दवाखाना व इतर अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांना या मार्गावरून प्रवास करावा लागतो. बससेवा बंद असल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा किंवा अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असून त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेषत: विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असून ती दीर्घकाळ बंद ठेवणे योग्य नाही. त्यामुळे लोटन पोहामिल चौक मार्गावरील एसटी बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन प्राप्त झाल्यापासून पुढील तीन दिवसांच्या आत बससेवा पूर्ववत सुरू करावी, अन्यथा नागरिकांच्या वतीने शांततामय व लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. संबंधित विभागाने या मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी मेहताबसिंग ठाकूर यांनी केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *