प्राण्यांच्या शिकारीचा डाव उधळला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेडा : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र कवलेवाडा, नियतक्षेत्र सितासावंगी येथील कक्ष क्रमांक ६५ मधील राखीव जंगलात वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने गेलेल्या सहा संशयित आरोपींवर वनविभागाने कारवाई केली. याप्रकरणी आतापर्यंत सहाही आरोपी वनविभागाच्या ताब्यात आले असून, पुढील चौकशी व तपास सुरू आहे. वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, २९ आॅगस्ट २०२६ रोजी रात्री साडेसातच्या सुमारास सितासावंगी येथील काही इसम वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलात गेल्याची माहिती नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामटेके यांना मिळाली. माहिती मिळताच वनाधिकारी व वनकर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध सुरू केला. यावेळी राजेश हेमराज लाळे (रा. लोभी) याला पकडण्यात वनविभागाला यश आले. मात्र, इतर आरोपी अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पसार झाले. यानंतर ३० आॅगस्ट रोजी फरार आरोपींचा शोध घेण्यात आला.

या कारवाईदरम्यान आकाश मेहतर लाळे व पतीराम उदाराम मेश्राम (दोघेही रा. सितासावंगी) यांना वनविभागाने ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना तुमसर येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी, भंडारा येथे ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, २ सप्टेंबर रोजी वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, या प्रकरणातील आणखी तीन फरार आरोपी लेंडेझरी गावालगतच्या जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाची विशेष पथक तयार करून संबंधित ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरोपी क्रमांक २, ५ व ६ यांना ताब्यात घेण्यात आले असून, चौकशीसाठी त्यांना नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक योगेन्द्र सिंह, भंडारा तसेच प्रकाश्ठ निष्कासन अधिकारी रितेश भोंगाडे, गडेगाव आगार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामटेके, क्षेत्रसहाय्यक संजय शेंडे, टी. एच. घुले, बिट रक्षक व्ही. के. नेवारे, पी. एस. पंचबुधे, डी. जे. उईके, ओ. एन. मारे, एम. के. सूर्यवंशी तसेच नाकाडोंगरी फफळ पथक सहभागी झाले होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *