आयटीआय नामकरणासाठी बेमुदत आमरण उपोषण शासनाच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

तुमसर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसरचे नामकरण करण्याबाबतचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा, या मागणीसाठी ‘स्वराज्य युवा एकता फाउंडेशन’चे अध्यक्ष अमित मेश्राम यांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयटीआय प्रांगणात सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण प्रशासनाच्या मध्यस्थी आणि लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

तुमसर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामकरणाचा प्रलंबित विषय तात्काळ मार्गी लावावा, या मागणीसाठी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनच्या वतीने प्रशासनाला पूर्वसूचना देऊन बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी सकाळपासून अमित मेश्राम यांनी प्रत्यक्ष उपोषणाला सुरवात केली.

या आंदोलनाला विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दर्शवला. आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख नरेश डहारे, युवासेना जिल्हाप्रमुख मनोज चीबे, युवासेना तालुका प्रमुख पवन खपास, सामाजिक कार्यकर्ते सलमान पठाण, हर्ष फठाने, माजी तालुका प्रमुख भोजराज येवले, लकिश तिजारे, पत्रकार मोहन भोयर, अमित रंगारी, धनंजय बडवाईक, रामेश्वर रहांगडाले, सुलोचना कुंभार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे परमानंद कटरे, पुरुषोत्तम डबाले, निलेश फोकसे, विठ्ठल डायरे, सचिन फनीजे, माजी नगरसेवक लक्ष्मीबाई सलामे, विकास आगाशे, राजकुमार बागडे, अंकित पाठक, उमेश कांबळे, गौतम वर्मा, शिशुपाल सावे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाकडून मुंबईतील बैठकीचे निमंत्रण

उपोषणाची गंभीर दखल घेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय (नागपूर) चे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे यांनी मुंबईतील संचालक सतीश सूर्यवंशी यांच्या ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या ६:०० वाजता आलेल्या दूरध्वनी संदिचा संदर्भ देत उपोषणकर्त्यांना अधिकृत पत्र सुपूर्द केले. या पत्रानुसार, या विषयावर तोडगा काढण्यासाठी संचालनालय, मुंबई येथे दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता बैठकीची मान्यता देण्यात आल्याचे कळवून उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली.

नवरोत्सवामुळे तारीख बदलून देण्याची मागणी

प्रशासकीय पत्र स्वीकारल्यानंतर उपोषणकर्ते अमित मेश्राम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “दिनांक १६ ऑक्टोबर रोजी नवरात्र उत्सव असल्यामुळे या काळात मुंबई येथील बैठकीस उपस्थित राहणे शक्य होणार नाही. त्यामुळे दसऱ्यानंतरची दुसरी सोयीची तारीख आमच्याकडून लवकरच प्रशासनाला कळवली जाईल आणि त्या तारखेला बैठकीचे आयोजन करण्यात यावे,” अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली.

प्रशासनाने बैठकीचे दिलेले लेखी आश्वासन विचारत घेऊन हे बेमुदत आमरण उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. दसऱ्यानंतर ठरणाऱ्या मुंबईतील बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला.

चौकट (पत्रातील मजकूर):

“शासनने मुंबईत बैठकीचे लेखी आश्वासन दिल्याने आम्ही उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. परंतु प्रशासनाने प्रस्तावित केलेली १६ ऑक्टोबर ही तारीख नवरात्रोत्सवाच्या काळात येत असल्यामुळे त्यादिवशी मुंबईतील बैठकीस उपस्थित राहणे शक्य होणार नाही. त्यामुळे दसऱ्यानंतरची एखादी सोयीची तारीख आम्ही प्रशासनाला कळवू आणि त्या दिवशी या बैठकीचे आयोजन केले जावे. दसऱ्यानंतर मुंबईत होणाऱ्या या बैठकीत आयटीआयच्या नामकरणाबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

— अमित मेश्राम, संस्थापक अध्यक्ष, स्वराज्य युवा एकता फाउंडेशन तुमसर

“नामकरणाचा प्रस्ताव यापूर्वी अनेकांकडे पाठवलेला आहे परंतु सध्या नागपूर विभागात आचारसंहिता विधान परिषदेची सुरू असल्यामुळे शासनाकडून जिआर काढता येणार नाही. आचारसंहिता संपल्यावर शासनाकडून शासन निर्णय काढण्यात येईल तोपर्यंत आमरण उपोषण मागे घ्यावे.”

— सतीश सूर्यवंशी, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *