पवनी चा बॅक लॉग भरण्याकरिता आम्ही कटीबध्द

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: पवनी नगर परिषदेचा बॅक लॉग बाकी आहे आणि तो भरून काढण्यासाठी येथील ३७२ विविध धर्माच्या मंदिरांचे विकासाकरिता ५०० कोटींचा निधी मंजुर करून आणण्याकरिता मी कटिबध आहे. तो बॅक लॉग भरण्याकरिता मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा शब्द पवनीच्या नागरिकांना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला. ते शनिवारी पवनी येथील सक्सेना प्राथमिक शाळेच्या पटांगणात आयोजित दहीहंडी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. गोकुळ मित्र मंडळ पवनी आणि आ. नरेंद्र भोंडेकर मित्र मंडळ तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विशेष अतिथी म्हणून आचार्य रुपानंद महाराज मंचावर उपस्थित होते. आम. भोंडेकर आपल्या भाषणात म्हणाले कि, त्यांनी भंडारा पवनी विधान सभेचा आमदार म्हणून आपले कर्तव्य निभावण्याचे पूर्ण प्रयत्न केले. अश्यात जेव्हा पवनी नगर परिषदे अंतर्गत जल पर्यटन, सिव्हरेज, तलाव सौंदर्यीकरणसह रस्ते निर्माण करिता निधी आणला तर लोक प्रश्न करायचे कि, इतक्या लहानश्या नगर परिषदेला हि कामे होऊ शकणार का? पण हे सर्व करणाºयावर निर्भर करते. कारण हे सर्व प्रोजेक्ट आणले आहे आणि त्याची कामे सुद्धा पूर्ण होतील.

इतकेच नाही तर आता नवीन कामे सुद्धा आणू. त्यांनी हमी दिली कि आता लोकांना अशी नवी पवनी पाहायला मिळेल कि ते म्हणतील हि खरच विदर्भाची कशी आहे आणि सुंदर आहे. तेव्हा या पवनी चा विकास कुणी थांबवू शकणार नाही. आम. भोंडेकर पुढे म्हणाले कि, कुणी कितीही नकारात्मक असेल तरीही ते स्वत: सकारात्मक आहे. यावेळी मंचावर उपस्थित पवनी नगर परिषदेच्या अध्यक्षा डॉ. विजया नांदुरकर यांना आम. भोंडेकर यांनी हमी दिली कि तुम्ही कामे करा ते आमदार म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहतील. आम. भोंडेकर यांनी पवनी चा बॅक लॉग भरण्याची हमी देत म्हणाले कि पवनी तील ३७२ विविध धर्माच्या धार्मिक स्थळांचे जतन करणे आहे.

येथील धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसांचे जतन करून क्षेत्राच्या विकासा करिता ते राज्य शासनाकडून तब्बल ५०० कोटींचा निधी खेचून आणतील आणि या करिता ते सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपस्थितांना दिली. ज्यामुळे पवनीला राष्ट्रीय धार्मिक पर्यटनाच्या नकाश्यावर वेगळी ओळख निर्माण होईल. ज्यातून पवनीचा पर्यटन वाढून पर्यटनाला चालना तर मिळेलच सोबतच येथील हजारो हातांना रोजगार उपलब्ध होईल, ज्यामुळे पवनी सोडून कुणाला जावे लागणार नाही. यावेळी मंचावर शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने यांच्या अध्यक्षतेत, गोंदिया भंडारा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर, उप जिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, जिल्हा संघटक बंडू हटवार, उप जिल्हा प्रमुख विजय काटेखाये, उप जिल्हा प्रमुख किशोर पंचभाई, शिवसेना तालुका प्रमुख जितेश इखार, तालुका प्रमुख बाळू फुलबांधे, शहर प्रमुख अनिल धकाते, युवा सेना प्रमुख भोजराज वैद्य, आणि युवासेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा गोसे ग्रामपंचायतीचे सरपंच आशिषकुमार माटे, पवनी न.प. चे गटनेता नामदेव सूरकर, माजी न.प. उपाध्यक्ष नरेश बावनकर, युवा सेना प्रमुख भोजराज वैद्य, प्रशांत भुते, उपशहर प्रमुख श्रीकांत भोगे, नगर सेवक देवराज बावनकर, नगर सेविका नगर सेविका सौ वैष्णवी हटवार, नगर सेविका सौ ज्योती तेलामासरे सह अन्य पदाधिकार उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *