उन्हाळी धानाचे चुकारे रखडले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील मडेघाट येथील शेतकºयांनी उन्हाळी हंगामात विक्री केलेल्या धानाचे पैसे अद्याप बँक खात्यात जमा झाले नसल्याने शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. धान विक्री करून जवळपास दोन महिन्यांहून अधिक कालावधी लोटूनही पैसे मिळाले नसल्याचा आरोप करीत शेतकºयांनी ७ सप्टेंबर सोमवारी रोजी लाखांदूर तहसीलदारांना निवेदन देत तातडीने चौकशी करून थकीत रक्कम खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, मडेघाट येथील शेतकºयांनी उन्हाळी हंगामातील धानाची संबंधित खरेदी केंद्रावर विक्री केली.

धान विक्री केल्यानंतर जवळपास दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असतानाही अद्याप धानाचे पैसे शेतकºयांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, नवीन पिकासाठी लागणारे खत, औषधे तसेच इतर आवश्यक कृषी साहित्यखरेदी करताना अडचणी निर्माण होत आहेत. धान विक्री करूनही मोबदला वेळेत मिळत नसल्याने शेतकºयांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित खरेदी-विक्री यंत्रणा अथवा कार्यालयीन स्तरावर काही विलंब होत आहे का, याबाबत शेतकºयांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करतेवेळी, आकाश ढोरे, देवेंद्र ठेंगरे, कुणाल सुखदेवे, माधव हरी मेश्राम, दीपक तुपटे, रामचंद्र लुटे, दीपरत्न वासनीक, विनायक कोडापे, अजय तुपटे, परसराम सुखदेवे, यशवंत बनसोड यासह आदी शेतकरी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *