भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- महाराष्ट्रात आज बैलपोळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात असताना, गोंदिया जिल्ह्यातील पांजरा गावात शेतकºयांनी आगळावेगळा पोळा साजरा करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. बैलजोडीला सजवण्यासाठी नवीन कपडे आणि सजावटीचे साहित्य न घेता, शेतकºयांनी थेट बैलजोडीवर बॅनर लावून शासनाकडे धानाच्या बोनसची मागणी केली. पांजरा गावातील शेतकºयांनी बैलजोडीवर ‘सरकारने दिलेला शब्द पाळा, धानाचा बोनस द्या’ असे संदेश असलेले बॅनर लावले. पोळ्याच्या निमित्ताने या अनोख्या पद्धतीने शासनाचे लक्ष वेधून घेत शेतकºयांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षभरापासून धान उत्पादक शेतकºयांना बोनस देण्याबाबत शासनाकडून घोषणा आणि आश्वासने दिली जात असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.
मात्र, वर्ष उलटूनही धानाचा बोनस मिळालेला नसल्याने शेतकºयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यातच वाढती महागाई, शेतीचा वाढता खर्च आणि उत्पादनाला मिळणारा अपेक्षित मोबदला यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पोळा हा शेतकरी आणि बैलांच्या नात्याचा सण मानला जातो. या दिवशी शेतकरी आपल्या बैलजोडीला सजवून त्यांची पूजा करतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. मात्र, यंदा पांजरा गावातील शेतकºयांनी पारंपरिक सजावटीऐवजी आपल्या मागण्यांचे बॅनर बैलजोडीवर लावून शासनाला संदेश दिला. सरकारने दिलेला शब्द पाळावा आणि धानाचा बोनस तातडीने द्यावा’, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. आता शासन शेतकºयांच्या या मागणीची दखल घेऊन धानाचा बोनस कधी जाहीर करते, याकडे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांचे लक्ष लागले आहे.