गटशिक्षणाधिकाºयांच्या रिकाम्या खुर्चीला विद्युत प्रकाश अन् पंख्याचा वारा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : एकीकडे महावितरणकडून नागरिकांना वीज बचतीचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे शासकीय कार्यालयांमध्येच विजेचा अपव्यय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भंडारा पंचायत समिती कार्यालयातील गटशिक्षणाधिकारी यांच्या कक्षात बुधवारी दुपारी याचा प्रत्यय आला. गटशिक्षणाधिकारी श्री. उशिरे हे त्या वेळी त्यांच्या कक्षात उपस्थित नसतानाही कक्षातील विद्युत दिवा आणि पंखा सुरू असल्याचे दिसून आले. अधिकारी कक्षाबाहेर असताना दिवा आणि पंखा सुरू ठेवण्याची गरज काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये वीज बचतीबाबत सातत्याने सूचना दिल्या जातात. कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचारी कक्षाबाहेर गेल्यानंतर अनावश्यक विद्युत उपकरणे बंद करण्याची अपेक्षा असते. मात्र, प्रत्यक्षात त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या प्रकारातून स्पष्ट होते. विशेष म्हणजे, अधिकारी कक्षात नसतानाही त्यांच्या रिकाम्या खुर्चीला दिव्याचा प्रकाश आणि पंख्याचा वारा मिळत असल्याचे उपरोधिक चित्र पाहायला मिळाले. विजेचा अपव्यय रोखण्यासाठी संबंधित प्रशासनाने शासकीय कार्यालयांमध्ये आवश्यक त्या सूचना देऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *