पत्रकार सूरज बागडे यांच्या निधनाने भंडाºयात हळहळ!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : रोजच्या धावपळीत भेटणारी माणसं, कामानिमित्त होणाºया गाठीभेटी, एकमेकांची आपुलकीने होणारी विचारपूस… या सगळ्यात काही माणसं नकळत आपल्या आयुष्याचा भाग बनून जातात. पत्रकार सूरज बागडे हे त्यापैकीच एक नाव. नेहमी शांत, हसतमुख आणि सर्वांशी मिळूनमिसळून राहणारा हा सहकारी असा अचानक आपल्यातून निघून जाईल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. मात्र, नियतीने घात केला आणि जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी सूरज बागडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भंडारा जिल्ह्यातील पत्रकार बांधवांना मोठा धक्का बसला.

पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना अनेक माणसं भेटतात. काहींशी केवळ कामापुरता संबंध राहतो, तर काही माणसं आपल्या स्वभावाने कायमची मनात घर करून जातात. सूरज बागडे यांनीही आपल्या साध्या, शांत आणि मनमिळाऊ स्वभावाने सहकाºयांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले होते. कुणाशीही मोठेपणाचा आव न आणता सहजपणे संवाद साधणारा, सामाजिक प्रश्नांची जाण असलेला आणि माणुसकीची नाती जपणारापत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. बातम्यांच्या मागे धावणारा पत्रकार एक दिवस स्वत:च अशी दु:खद बातमी बनून समोर येईल, हे स्वीकारणे त्यांच्या सहकाºयांसाठी कठीण झाले आहे.

सूरज बागडे यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने संघाचे अध्यक्ष चेतन भैराम यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित पत्रकार बांधवांनी सूरज यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी सूरज बागडे यांचा शांत स्वभाव, सहकाºयांशी असलेली आपुलकी आणि सामाजिक क्षेत्राविषयीची त्यांची जाणीव यांचा उल्लेख करण्यात आला. त्यांच्या अचानक जाण्याने केवळ एक पत्रकारहरपला नाही, तर रोजच्या सुखदु:खात सहभागी होणारा एक आपला माणूस कायमचा दुरावला, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

या शोकसभेला पत्रकार संघाचे सचिव मिलिंद हडवे, इंद्रपाल कटकवार, आबिद सिद्दीकी, राकेश चेटुले, अजय मेश्राम, सागर भांडारकर, देवानंद नंदेश्वर, युवराज गोमासे, चंद्रकांत श्रीकोंडवार, कॉ. हिवराज उके, बाबा बच्छील, राजू मस्के, प्रवीण कारेमोरे, रामा श्रीसागर, समीर नवाज, विलास केजरकर, दीपक रोहनकर, अनिल रहांगडाले, चंद्रकांत शहारे, संजय भोयर यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. माणूस निघून जातो, पण त्याचा स्वभाव, त्याने जोडलेली माणसं आणि त्याच्यासोबतच्या आठवणी मागे राहतात. सूरज बागडे यांच्या बाबतीतही आज हीच भावना प्रत्येक सहकाºयाच्या मनात आहे. पत्रकारितेच्या धावपळीत पुन्हा अनेक बातम्या येतील, अनेक कार्यक्रम होतील, सहकाºयांच्या भेटीगाठीही होतील; पण त्या गर्दीत सूरज बागडे यांची अनुपस्थिती मात्र कायम जाणवत राहील. पत्रकार म्हणून समाजातील घडामोडी लोकांपर्यंत पोहोचविणाºया सूरज बागडे यांच्या निधनाने भंडारा जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दु:खात भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघ सहभागी असून, उपस्थितांनी दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *