विद्युत करंट लागल्याने एकाचा मृत्यू

लाखांदूर येथील घटना

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

लाखांदूर : निर्माणाधीन घरातील वायरिंग करीत असताना विद्युत शॉक लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास लाखांदूर येथे घडली. नितेश श्रीराम तुपटे (४०) शारदा चौक लाखांदूर असे घटनेतील मृतकाचे नाव आहे.

पोलीस सूत्रानुसार, घटनेतील मृतक नितेश हा आपल्या भावाला घेऊन इलेक्ट्रिक फिटिंगची कामे लाखांदूर व परिसरात करतो. घटनेच्या दिवशी दोन्ही भाऊ निर्माणाधीन घरमधील पंख्याची वायरिंग करीत असताना नितेश उभा असलेल्या लोखंडी स्टॅन्डला करंट लागला. नितेशला विद्युत शॉक लागतच तो स्टॅन्ड वरून खाली पडला.

ही घटना बाजूच्या खोलीत असलेल्या घरमालकाच्या लक्षात येताच त्याने खाली पडलेल्या नितेशला उपचारासाठी स्थानिक लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच ठाणेदार शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला.

वृत्त लिहितोवर शवविच्छेदन झाले नसून मर्ग दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा माहिती देण्यात आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *