भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा येथे एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात सर्वच स्तरातुन संताप व्यक्त केला जात आहे.त्याचाच एक भाग म्हणुन आज भंडारा शहरातील हजारो नागरीकांनी रस्त्यावर उतरूण आपला संताप व्यक्त केला. आरोपीला फाशी देण्यात यावी, सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. घटनेच्या निषेधार्थ आज भंडारा बंदलाही लोकांचा प्रतिसाद दिसुन आला. भंडारा शहरातील आंबेडकर वार्डातील समाज भवनाच्या स्वच्छतागृहात नेऊन एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचा प्रकार काल दि.६ आॅगस्ट रोजी उघडकीस आला.एका ३० वर्षीय आरोपीने केलेल्या घृणास्पद कृत्यानंतर लोकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळून आली. पोलिसांनी कारवाई करीत आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान आरोपीने घटनेनंतर स्वत:ला इजा करून घेतली होती. आरोपी हा मानसिक दृष्ट्या विकलांग असल्याचे सांगितले जाते. मात्र या संदर्भात अधिकृत पृष्टी झालेली नाही. पीडित मुलगी आणि आरोपीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना हजारोच्या संख्येत नागरीकांनी जिल्हा रूग्णालयाला घेराव घालीत आरोपीला नागरीकांच्या ताब्यात देण्याचा आग्रह सुरू केला. प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि हजारो नागरिक यांच्यात रात्री बारा वाजेपर्यंत यासाठी ओढाताण सुरू होती. दरम्यान आरोपीला मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात पुढील उपचाराकरीता नागपूरला नेण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज ७ आॅगस्ट रोजी भंडारा बंद चे आवाहन करून निषेध मोर्चा काढण्याचे जाहीर करण्यात आले.
आज सकाळपासुनच नागरीकांनी भंडारा शहरातील गांधी चौकामध्ये गर्दी करण्यास सुरूवात केली. सर्व राजकीय हेवेदावे विसरून हजारो नागरीकांनी या आवाहनाला समर्थन देत आपली उपस्थिती दर्शविली. यात विद्यार्थिनी आणि तरुण-तरुणींचा सहभाग मोठा होता. यावेळी गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. फाशीची शिक्षा आणि जलद गती न्यायालयात चालविण्याची मुख्य मागणी यावेळी लावून धरण्यात आली. एकीकडे मोर्चा निघाला असताना दुसरीकडे शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्याचे चित्र होते. व्यापाºयांपासून छोट्यामोठ्या व्यवसायिकांनी घटनेच्या निषेधार्थ आपले योगदान या निमित्ताने दिले. शहरातील बºयाच शाळांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवीत घटनेचा निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयात या मोचार्चे सभेत रूपांतर झाल्यानंतर अन्यायाविरुद्ध एकत्रित लढाउभारण्यासाठी नेहमी तयार रहा असे आवाहन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थिनींनी यावेळी शहरात महिला असुरक्षित असल्याची तक्रारही पोलिसांकडे केली.यावेळी पोलीसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.