भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- अयोध्या येथील श्री राम मंदिरातील दानपेटी चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ आज गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात आगळ्यावेगळे भजन दिंडी आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अमर वराडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी भजन आणि दर्शनाच्या माध्यमातून निषेध नोंदवला. या प्रकरणी मंदिर ट्रस्ट बरखास्त करून चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. हे आंदोलन गोंदिया शहरातील काँग्रेस भवन येथून सुरू झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात पक्षाचे झेंडे घेतले होते आणि डोक्यावर गांधी टोपी परिधान केली होती. ‘रघुपती राघव राजाराम’, ‘राम कृष्ण हरी’ आणि इतर भजने म्हणतकार्यकर्त्यांची दिंडी संपूर्ण शहरातून निघाली. भजनाच्या तालावर कार्यकर्त्यांची दिंडी संपूर्ण शहरातून निघाली. भजनाच्या तालावर नागरिकांनीही या दिंडीकडे लक्ष वेधले.
अयोध्येतील राम मंदिर दान चोरीच्या निषेधार्थ गोंदियात कॉंग्रेसची भजन दिंडी