नागपूर : कामठी रोडवरील आॅटोमोटिव्ह चौकाजवळ शुक्रवारी सकाळी सुमारे १०:३० वाजता २८ वर्षीय ब्यूटीशियन अंजली पांडे स्कूटरवरून इंदोºयाच्या दिशेने जात असताना अपघात झाला. निर्माणकायार्मुळे रस्त्याच्या एका भागावर दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू होती. याचदरम्यान अंजली यांचा स्कूटरवरील ताबा सुटून त्या खाली पडल्या आणि मागून येणाºया आपली बसच्या डाव्या चाकाखाली आल्या. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रस्त्यावरील खड्डयामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; मात्र तपास पूर्ण झाल्यानंतरच कारण स्पष्ट होणार आहे.