९.१९ कोटींच्या ९५८ वीज चोऱ्या उघडकीस
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
नागपूर: वीज चोरांचे धाबे दणाणत महावितरणच्या नागपूर परिमंडळाने अनधिकृत वीज वापरकर्त्यांविरोधात जोरदार सर्जिकल स्ट्राइक केला आहे. सप्टेंबर २०२६ या एकाच महिन्यात नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आणि वर्धा या तिन्ही मंडलांत धडक धाडी टाकून तब्बल ९५८ वीज चोऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला. या धडक मोहिमेमुळे चोरीची वीज वापरणाऱ्यांचे पितळ पुरते उघडे पडले आहे.
महावितरणच्या वीज चोरी विरोधी तपासणी पथकांनी संपूर्ण ताकदीने राबवलेल्या या मोहिमेत ९५८ पैकी ९०१ ग्राहकांचा काळाबाजार उघडकीस आणत १ कोटी १९ लाख ४० हजार रुपयांच्या बिल व दंडाचा दणका देण्यात आला. महावितरणच्या आक्रमक पाठपुराव्यापुढे वीज चोरांना झुकावे लागले असून, अवघ्या काही दिवसांत ४८६ ग्राहकांकडून ६५ लाख ७० हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ५ लाख ५१ हजार युनिट्सची वीज चोरी निष्पन्न झाली असून पैकी ३ लाख ७ हजार युनिट्सच्या दंडात्मक रकमेची वसुली पूर्ण झाली आहे.
नागपूर शहर मंडलात ३८७ वीज चोऱ्यांवर वीज चोरांवर सर्वाधिक हल्लाबोल झाला. पैकी ३७२ ग्राहकांचे ५५ लाख ९० रुपयांचे उल्लंघन पकडले गेले असून १६३ ग्राहкаंकडून २१ लाख ४० हजार रुपयांची वसुली झाली. यामध्ये महाल विभागात १०३, सिव्हिल लाइन्समध्ये ८८, गांधीबागमध्यें ७३, बुटीबोरीमध्ये ६६ आणि काँग्रेस नगर विभागात ५७ वीज चोरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर दुसरीकडे नागपूर ग्रामीण मंडलातही ३७४ प्रकरणे उघडकीस आली पैकी ३४२ ग्राहкана ४६ लाख ९० रुपयांचे बिल ठोकाळण्यात आले, ज्यापैकी २१३ ग्राहकांकडून ३१ लाख २० हजार रुपये वसूल करण्यात आले. मौदा विभागात सर्वाधिक १३० चोऱ्या पकडल्या गेल्या, तर उमरेडमध्ये ९०, सावनेरमध्ये ८८ आणि काटोलमध्ये ६६ प्रकरणांवर कडक कारवाई करण्यात आली. दुसऱ्यांकडे, यापुर्वी १ एप्रिलते ३० सप्टेंबर २०२६ या सहा महिन्याच्या काळात परिमंडळात २ कोटी रुपयांच्या मुल्याच्या तब्बल १६९४ वीज चोऱ्या उघडकीस आल्या होत्या, त्यात ग्रामीण मंडलात ५८८, शहर मंडलात ४७१ तर वर्धा मंडलातही ५३५ वीज चोऱ्यांचा समावेश आहे. तसेच वर्धा मंडलातही महावितरणने धडक मोहीम राबवून १९७ प्रकरणे उघडकीस आणली. पैकी १८३ ग्राहकांना १६ लाख ६० हजार रुपयांचे बिल दिले गेले, ज्यापैकी १२० ग्राहकांकडून १३ लाख २० हजार रुपये वसूल झाले. यामध्ये वर्धा विभागात ७४, हिंगणघाटमध्ये ७१ आणि आर्वी विभागात ५२ प्रकरणे उघडकीस आली.
कारवाईदरम्यान ३५१ ग्राहकांनी तडजोड शुल्क (कंपॉऊंडिंग चार्जेस) भरून सुटका करून घेतली असली, तरी वीज चोरी करून अरेरावी करणाऱ्या आणि सहकार्य न करणाऱ्या ३ वीज चोरांवर पोलिस ठाण्यात थेट गुन्हे (इफर) दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये गांधीबाग विभागात २ आणि सावनेर विभागात १ गुन्हा नोंदवला गेला आहे.
प्रामाणिक ग्राहकांच्या हक्काय दरॉडा घालणाऱ्या आणि वीज यंत्रणेचे नुकसान करणाऱ्या वीज चोरांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. महावितरणची ही धडक मोहीम यापुढे अधिक तीव्र होणार असून चोरीची वीज वापरणाऱ्यांचे धाबे दणाणणार आहेत, असा इशारा देत महावितरण प्रशासनाने सर्वांना अधिकृत वीज जोडणी घेण्याचे अंतिम आवाहन केले आहे.