दु:खाच्या प्रसंगी आधाराची शीत शवपेटी; जयंत बडवाईक यांचा लोकसभेचा संकल्प

सावरबंध येथे निःशुल्क शीत शवपेटीचे लोकार्पण ■ सहा-सात महिन्यांपासून गरजूना जीवनावश्यक वस्तूंचेही मोफत वाटप

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

साकोली: समाजसेवा ही केवळ प्रसिद्धीसाठी नव्हे, तर गरजेच्या वेळी माणसाच्या मदतीला धावून जाण्यासाठी असते, हा विचार प्रत्यक्ष कृтіत आणत जयंत बडवाईक लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सावरबंध येथे निःशुल्क शीत शवपेटी उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाचे लोकार्पण राजकीय पदाधिकाऱ्यांऐवजी तालुक्यातील पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामीण भागातील अनेक नागरिक रोजगार, व्यवसाय व नोकरीनिमित्त परगावी राहतात. कुटुंबातील व्यक्तीच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर नातेवाईकांना गावी पोहोचण्यास विलंब होतो. अशा वेळी पार्थिव सुरक्षित ठेवण्याची समस्या निर्माण होते. ही अडचण लक्षात घेऊन उपलब्ध करून दिलेल्या शीत शवपेटीचा सावरबंध, कुंभली, बोंड, वडद, खांड्या तसेच साकोली तालुक्यातील गरजू नागरिकांना निःशुल्क लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, जयंत बडवाईक लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील सहा-सात महिन्यांपासून सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब, मजूर वर्ग, महिला मंडळे आणि गरजू नागरिकांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक वस्तूंचे दरमहा एकदा लकी ड्रॉच्या माध्यमातून निःशुल्क वाटप केले जाते. सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम परिसर सुरू आहे.

लोकार्पण सोहळ्यार पत्रकार राजेश बैस, संतोष फोरे, डी.जो. रंगारी, किशोर रंगारी, नाजीम पाशाभाई, आशिष चेदगे, प्रशांत शिवनकर, चेतक हतीमारे, अंकित फापमते, साहिल रामटेके, भागवत बडवाईक, लोकसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पल्लवी येरणे, शेखर बडवाईक, शेरीसिंग चव्हाण, सुरेश दोनोंडे, संदीप रामटेके, प्रदीप बडवाईक, सुरज उफे, रोहित बावनकुळे, शिवचरण बडवाईक उपस्थित होते.

समाजासाठी उपयोगी पडता येणे, हा माझ्यासाठी खरा आनंद आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हे माझे कर्तव्य आहे, असे जयंत बडवाईक यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *