गोंदिया : जिल्ह्यात मागील ३ दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात मागील २४ तासात ८२.७ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. पावसामुळे गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथील बबई-कमरगाव मार्गावरील नाल्याला पूर आल्याने या दोन्ही गावांचा संपर्क तुटला गाहे. जुन महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाची संसतधार कायम आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले असताना छोट्या नाल्यांना पूर आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, मध्यरात्रीच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने रात्रभर चांगलेच झोडपून काढले.