भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : एका अल्पवयीन मुलीवर तिचे इच्छे विरुद्ध अत्याचार करणाºया युवकाविरुद्ध पोलीस स्टेशन तिरोडा येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी युवकाला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिरोडा पोलीस सूत्रांकडून मिळालेले माहितीनुसार फिर्यादी तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया क्षेत्रातील रहिवाशी असुन फियार्दीने पोलीसांना दिलेल्या तक्रारीनुसार तिला तिचे मुलीचे मोबाईलवर एका मुलासोबत फोटो दिसल्यावरून तिने मुलीस विचारपूस केली असता मुलीच्या सांगण्यानुसार त्यांच्याच वार्डात राहणारा युवक रौनक लखनलाल निमजे १९ वर्ष याच्यासोबत फिर्यादीच्या मुलीची ओळख होती. फिर्यादीच्या मुलीला आरोपीने एक व दोन तारखेच्या रात्री दोन वाजता फोन करून खैरलांगी मार्गावरील एका डेकोरेशनचे गोडाऊन जवळ बोलाविले असता पिडीता तिथे गेली. तिथे आरोपीने पिडीतेशी लंगट करण्याचा प्रयत्न केला असता पिडीतेने मी अजून लहान आहे तू माज्याशी लगट करू नको असे म्हटले असतानाही आरोपीने बळजबरीने पिडीतेच्या इच्छे विरुद्ध पिडीतेवर अत्याचार केला. प्राप्त तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी सदर युवका विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६५ (१) ७५ (१) सह कलम बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा ४,६, नुसार गुन्हा दाखल करून सदर युवकास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपिस ५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक दरड पाटील करीत आहेत.