गोंदियात मध्यरात्री थरार!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आटोपून घरी परतणाºया ३२ वर्षीय तरुणाचा दारूच्या नशेत झालेल्या क्षुल्लक वादातून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना गोंदिया शहरात घडली आहे. गोंदिया शहरातील अंगूर बगीचा परिसरातील मोबे हॉस्पिटलजवळ असलेल्या एकदंत कॉलनीत २८ आॅगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजून १५ मिनिटांनी ही रक्तरंजित घटना घडली. कॉलर पकडल्याच्या आणि झालेल्या धक्काबुक्कीच्या रागातून आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे गोंदिया शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिथून भैयालाल ठाकरे (वय ३२, रा. नवा टोला, नागरा) हा २८ आॅगस्टच्या रात्री आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेला होता. वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर मिथून हा दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास तो एकदंत कॉलनी परिसरात पोहोचला. याच ठिकाणी आरोपी संदीप देवदास मेश्राम (रा. कटंगी टोला) याच्यासोबत मिथूनचा संपर्क झाला. दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून अचानक वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची असलेल्या या वादाने काही क्षणांतच गंभीर स्वरूप धारण केले. वादाच्या भरात मिथूनने संदीपची कॉलर पकडून त्याच्याशी धक्काबुक्की केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे संदीप संतप्त झाला.

कॉलर पकडल्याचा आणि आपला अपमान झाल्याचा राग मनात मृतक मिथुन ठाकरे धरून संदीपने घरातून धारदार शस्त्र आणले आणि संदीपने मिथूनवर जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या वारांमुळे मिथून गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी संशयित आरोपी संदीप मेश्राम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (इठर) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. हत्येमागील नेमके कारण, वादाची सुरुवात कशी झाली आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम काय, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. क्षुल्लक वादाचा रक्तरंजित शेवट मित्राच्या वाढदिवसाच्या आनंदासाठी घराबाहेर पडलेल्या मिथूनचा रात्रीच्या सुमारास झालेल्या क्षुल्लक वादातून दुदैवी अंत झाला. काही क्षणांपूर्वी सुरू असलेला वाद एवढा टोकाला गेला की, त्यात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर एकदंत कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दारूच्या नशेत सुरू झालेला क्षुल्लक वाद थेट हत्येपर्यंत पोहोचल्याने, किरकोळ वादाचे गंभीर परिणाम किती भयावह असू शकतात, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *