भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील शेजगाव ग्रामपंचायत चे बीबीटोला येथील शेताचे झुडपात बिबट्याचे दोन शावक आढळल्याने या शावकांना कुत्रे वा इतर जंगली जनावरांन कडून धोका होऊ नये म्हणून काही गावकºयांनी दोन्ही शावकांना गावाचे शाळेजवळ आणून वन विभागाला माहिती दिल्यावरून वन विभागाचे अधिकारी कर्मचाºयांनी तेथे जाऊन दोन्ही शावकांची वैद्यकीय तपासणी करून जंगल परिसरात ठेवल्याने रात्री मादा बीबट शावक घेऊन गेली असुन या परिसरात वन विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. २६ जुलै चे सकाळी बीबीटोला येथील शेतशिवारातील झुडपात दोन बिबटाचे शावक दिसून आल्याने या शावकांना कुत्रे वा इतर वन्यप्राण्यतर्फे धोका होऊ नये म्हणून काही गावकºयांनी गावातील शाळेजवळ या शावकाना आणून वन विभागाला सूचना दिली.
वन्यजीव नवेगाव नागझिराचे वन परिक्षेत्र अधिकारी रवींद्र भगत, ब्राह्मणे, क्षेत्र सहाय्यक आय. आर सोनकुसरे, वनरक्षक सी.पी पारधी, अंबुले, पटले आगलावे यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही शावकांची वैद्यकीय तपासणी करून शावक सुस्थितीत असल्याची खात्री झाल्याने त्यांना झुडपी परिसरात ठेवून ट्रप कॅमेरे लावून पाळत ठेवली असता रात्री मादा बीबट येऊन दोन्ही शावकांना जंगल परिसरात घेऊन गेली असली तरी वन विभागातर्फे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वन विभागाची गस्त लावण्यात आली आहे.