भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया जिल्ह्यातील देवरी-आमगाव मार्गावर आज एक भीषण अपघात घडला. भरधाव कारचा चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट कालव्यात कोसळली. या अपघातात एका ६६ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, कारमधील इतर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुदैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना हरदोली गावाजवळील पुलावर घडली. नागपूर येथून साखरीटोला येथे येत असलेल्या एमएच ३५ 35 एजे. ३७७७ क्रमांकाच्या कारवरील चालकाचा अचानक ताबा सुटला. वेगात असले वाहन पुलावरील कठडा तोडून थेटकालव्यात/नहरात जाऊन कोसळले. अपघाताचा धक्का इतका मोठा होता की कारमधील प्रवाशांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. या भीषण अपघातात लीलाबाई गौतम वय ६६ वर्ष, रा. साखरीटोला यांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत विजय गौतम वय ४८ वर्ष, रा. साखरीटोला, सरिता गौतम वय ४०वर्ष, रा. साखरीटोला यश लक्षणे वय २५ वर्ष, रा. आमगाव स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच सालेकसा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी सालेकसा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.