गोंदियातील मुख्य बाजारात भीषण आग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया शहरातील मुख्य बाजार परिसरातील गोरेलाल चौकात असलेल्या प्रभू रोड वरील ‘वैभव कलेक्शन’ या कापड दुकानाला १२ वाजे च्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीत दुकानातील लाखो रुपयांचे रेडिमेड कपडे, इतर मटेरियल आणि फर्निचर जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुकानातून धूर बाहेर पडत असल्याचे आजूबाजूच्या दुकानदारांच्या लक्षात आले. क्षणात आगीचे लोळ वर जाऊ लागले आणि संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग लागताच परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. माहितीमिळताच गोंदिया नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *