दिघोरी मोठी येथे दहीहंडीचा थरार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी मोठी : ढोल-ताशांचा कडक- डाट, ‘गोविंदा आला रे आला’चा जयघोष आणि दहीहंडी फोडण्यासाठी उभारले जाणारे थरारक मानवी मनोरे… अशा उत्साहपूर्ण वातावरणात श्री संत गजानन महाराज दहीहंडी उत्सव मंडळ, दिघोरी मोठी यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचा दिमाखदार सोहळा पार पडला. प्रथम क्रमांकासाठी ३१ हजार रु. , तर द्वितीय क्रमांकासाठी २१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे स्पर्धेसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आल्याने गोविंदा पथकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा यावेळी आमदार नानाभाऊ पटोले, आमदार अविनाश ब्राम्हणकर, ठाणेदार प्रमोद शिंदे, माजी सरपंच अरुण गभणे, माजी सरपंच शंकर खराबे, उपसभापती संजना वरखडे, सरपंच सुनिता साळवे, उपसरपंच विजय खोब्रागडे, माजी जि. प. सदस्या माधुरी, उत्तम भागडकर, माजी पंचायत समिती सदस्य गुलाब कापसे, डॉ. विलासजी शेंडे, सुभाषजी खिलवाणी तसेच ग्रामपंचायत कमिटीचे संपूर्ण पदाधिकारी व आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत उद्घाटनीय सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गोविंदा पथकांना शुभेच्छा देत उत्सवाच्या माध्यमातून युवकांमध्ये एकजूट, संघभावना आणि सामाजिक बांधिलकी वाढावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टी. पाईंट बॉईज ग्रुपचा बाजीमार विजय दहीहंडी फोडण्यासाठी विविध गोविंदा पथकांनी जोरदार तयारी करत एकावर एक थर रचून मानवी मनोरे उभारले. हंडीपर्यंत पोहोचण्याच्या प्रत्येक प्रयत्नाला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषात दाद दिली. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर अक्षरश: दुमदुमून गेला. प्रथम बक्षीस रु. ३१ हजारांचे टी. पाईंट बॉईज ग्रुप, दिघोरी मोठी यांनी पटकावले, तर द्वितीय बक्षीस रु. २१ हजारांचे राधेकृष्ण ग्रुप, दिघोरी मोठी यांनी मिळविले. विजेत्या पथकांचे उपस्थित मान्यवर व नागरिकांनी अभिनंदन केले. दोन्ही आमदारांचा डान्स; नानाभाऊ पटोलेंच्या आगमनाने जल्लोष दहीहंडी उत्सवात दोन्ही आमदारांनी डान्स करत तरुणाईच्या उत्साहात सहभाग घेतला. तसेच आमदार नानाभाऊ पटोले यांचे आगमन होताच नागरिक व आयोजकांनी दहीहंडीच्या ठिकाणी जाऊन आनंद साजरा केला. यामुळे उत्सवाच्या जल्लोषात आणखी भर पडली. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री संत गजानन महाराज दहीहंडी उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील युवकांनी परिश्रम घेतले. पारंपरिक संस्कृती, उत्साह आणि सामाजिक एकजुटीचा संदेश देणाºया या सोहळ्याचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *