दिल्लीत ‘कॉकरोच’ च्या आंदोलनाला हिंसक वळण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘कॉकरोच जनता पार्टी’ च्या ‘संसद मार्च’ ला हिंसक वळण मिळाल्याचे वृत्त आहे. नीट पेपर लीक प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतआंदोलक आक्रमक झाले. या आंदोलकांनी कॅनॉट प्लेससह अनेक ठिकाणी तोडफोड केली. एवढेच नाही तर, पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. दरम्यान, संसद भवनाजवळ पोहोचलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच यावेळी काहीसा लाठीचार्जदेखील करण्यात आला.

पोलिसांनी आंदोलकांना संसद मार्ग आणि कर्तव्य पथवरून हुसकावून दिल्यानंतर, ते दिल्लीच्या मध्यवर्ती कॅनॉट प्लेस परिसरात जमले. पालिका बाजार आणि सेंट्रल पार्क भागात हजारोच्या संख्येनेआंदोलकांनी निदर्शने केली. दरम्यान काही काहींनी पोलिसांनाच लक्ष्य केले आणि अचानक दगडफेक करायला सुरुवात केली आणि वाहनांची तोडफोड केली. यानंतर, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनीही बळाचा वापर केला आणि आंदोलकांना पांगवले. नीट पेपर लीकविरोधात गेल्या २० जूनपासून जंतर-मंतरवर कॉकरोचचे आंदोलन सुरू होते. सोनम वांगचुक यांना शनिवारी पोलिसांनी आंदोलन स्थळावरून उचलले आणि रुग्णालयात दाखल केले. यानंतर, उखढ संस्थापक अभिजित दीपकेने उपोषण सुरू केले. यानंतर, गर्दीही वाढली. सोमवारी संसद मार्च दरम्यान गर्दी एवढी वाढली की, दिल्ली पोलिसां बंदोबस्तही कमी जाणवू लागला.

दरम्यान, अभिजीत दीपकसह बहुतेक सीजेपी नेते जंतर मंतरवरच थांबले असताना, त्यांचे समर्थक मात्र, संसदेच्या दिशेने निघाले. पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून ते संसद भवनाच्या अगदी जवळ पोहोचले. यानंतर, रेल्वे भवनाजवळ झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि जमावाला पांगवला. दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेणाºया कॉक्रोज जनता पाटीर्ने जे. नड्डा यांची भेट घेतली. यावेळी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची त्वरित सुटका करण्यात यावी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, तसेच नीट परीक्षा रद्द झाल्याने जीवन संपवणाºया विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशा मागण्या केल्या. तसेच धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दिला. त्यातच या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनीही समर्थन दिल्याने ते अधिक व्यापक झाले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *