धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी भंडाºयात भव्य मोर्चा आणि कॅन्डल मार्च

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नीटसह विविध राष्ट्रीय परीक्षांतील पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहारांविरोधात, तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ भंडाºयात सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले. एआयएसएफसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शेतकरी संघटना व विविध सामाजिक संघटनांनी काढलेल्या जनआक्रोश मोर्चात विद्यार्थी, युवक, पालक, शेतकरी मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग नोंदवत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गर्जना केली. भंडाºयातील त्रिमूर्ती चौकात एआयएसएफच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो विद्यार्थी आणि युवक या मोर्चात सक्रिय सहभागी झाले होते. त्यानंतर नारेबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. काल रविवारी संध्याकाळी देखील एआयएसएफ च्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. या ‘जनआक्रोश मोर्चा’ आणि कॅण्डल मार्चला मोठा प्रतिसाद मिळाला. चौकापासून आंदोलनादरम्यान ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा’, ‘पेपरफुटी रोखा’, एनटीएला उत्तरदायी धरा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये वारंवार समोर येणाºया पेपरफुटी, परीक्षा गैरव्यवहार आणि निकालातील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासही डळमळीत झाला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. त्यांच्या आंदोलनात हस्तक्षेप झाल्याच्या वृत्ताचा निषेध करत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली. मोचार्नंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात राष्ट्रीय परीक्षा संस्था ( ) ची पुनर्रचना, परीक्षा गैरव्यवहारांची न्यायालयीन चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, विद्यार्थ्यांना भरपाई, सुरक्षित आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था लागू करणे, तसेच आॅनलाइन परीक्षांऐवजी आॅफलाइन ठळअ परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनातील सर्वाधिक ठळक मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी परीक्षा गैरव्यवहारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, ही होती. याशिवाय विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली. संध्याकाळी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कॅण्डल मार्च काढण्यात आला. मेणबत्त्या हातात घेऊन विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी शांततेत निषेध नोंदवत, ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड मान्य नाही’, असा ठाम संदेश दिला. आंदोलनात एआयएसएफसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शेतकरी संघटना, सामाजिक संस्था आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास हा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *