भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : देशभरातील विविध विद्यार्थी प्रश्नांसह लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी कॉकरोच जनता पार्टी भंडारा च्या वतीने आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाºयांमार्फत भारताचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनात विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटना,युवकयुवती सामाजिक कार्यकर्ते व सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेल्या या ‘खेळा’ ला तात्काळ पूर्णविराम द्यावा, अशी मागणी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या गंभीर प्रकरणाची जबाबदारी घ्यावी, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या कथित बेकायदेशीर अटकेचा तीव्र निषेध नोंदविला. शांततेच्या मागार्ने आंदोलन करणाºया युवकांवर लाठीचार्ज व अश्रुधूराचा वापर करणे हे लोकशाहीला काळिमा फासणारे असल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा मोठा पाठिंबा लाभला. आम आदमी पार्टी, आझाद समाज पार्टी, भाकप, आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तसेच ओबीसी संघर्ष समिती, एकलव्य सेना यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. कॉकरोच जनता पाटीर्ने केंद्र सरका- रला इशारा देत पेपर लीक प्रकरणांवर कठोर कायदेशीर कारवाई करून दोषींना तात्काळ शिक्षा द्यावी, तसेच विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पारदर्शक परीक्षा प्रणाली राबवावी, अशी मागणी केली.
युवकांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात अर्पण गोस्वामी, पायल सतदेवे, शांतनू गभने, सुरेश खंगार, दीपक जनबंधू, मृणाल गोस्वामी, मुकुंद साखरकर, हिमांशू मेंढे, अलका वासनिक, माधुरी खोब्रागडे, वैशाली रामटेके, हेमा गजभिये, प्रमोद केसलकर व सुचिता मेश्राम यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो तरूणांची उपस्थिती होती.