धान उत्पादक शेतकºयांना बोनस द्या : खा. पटेल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नागपूर विभागातील किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासकीय व सहकारी धान खरेदी केंद्रांच्या अडचणी, सीएमआर भरडाई व साठवणूक, तसेच धान उत्पादक शेतकºयांच्या विविध समस्यांवर मुंबई येथील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयात बैठक पार पडली. मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला खासदार प्रफुल पटेल उपस्थित होते. बैठकीत खासदार प्रफुल पटेल यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. सध्या संकटात सापडलेल्या धान उत्पादक शेतकºयांना बोनस देण्याची मागणी शासनाकडेसातत्याने करण्यात आली असून, विधानसभा अधिवेशनातही बोनस देण्याबाबत शासनाकडून आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे धानाला बोनस मिळावा यासाठी नागपूर विभागातील सर्व लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आग्रह धरणार असल्याचे पटेल यांनी सांगितले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *