निर्माणाधीन पाण्याच्या टाकीवरून पडून १७ वर्षीय बालकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी मोठी :- नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या निमार्णाधीन पाण्याच्या टाकीवरून तोल जाऊन खाली पडल्याने १७ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. २ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. दस्तगीर महबूब आलम (१७), रा. गंडाल, जि. उत्तर दिनाजपूर (पश्चिम बंगाल) असे मृतकाचे नाव आहे. लाखांदूर येथील झिरोबा परिसरात मागील सात ते आठ महिन्यांपासून पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी पश्चिम बंगाल मधून मजूर आणण्यात आले आहेत. बांधकामासाठी आलेल्या मजुरांसोबत दस्तगीर हा त्याचा चुलत भाऊ व इतर मजु- रांसह सुमारे दोन-तीन महिन्यांपूर्वी लाखांदूर येथे आला होता. तो प्रत्यक्ष बांधकामाच्या कामात सहभागी नसला तरी कामगारांमध्ये वावरत असे. मजुरांना पाणी पोहोचविणे तसेच गरजेनुसार छोटीमोठी मदत करण्याचे काम तो करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

आज दि.२ सप्टेंबर बुधवारला सकाळी सुमारे ८ वाजता मजुरांनीपाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू केले. काही मजूर टाकीच्या वरच्या भागात काम करीत असताना सुमारे ११ वाजताच्या दरम्यान दस्तगीरही त्यांच्याकडे वर गेला. टाकीच्या वर गेल्यानंतर तो फिरत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. घटना लक्षात येताच कामावरील मजुरांनी त्याला तातडीने लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यात पोलीस हवालदार संतोष चव्हाण, राकेश हेमके तसेच पोलीस अंमलदार लंकेश राऊत, संदीप केंद्रे आदींनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला असुन लाखांदुर पोलिसाकडुन पुढील तपास सुरु आहे.कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *