पंधरा दिवसांत धान बोनस न मिळाल्यास जिल्हाव्यापी आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : खरीप हंगाम २०२४-२५ मधील उर्वरित धान बोनस तातडीने शेतकºयांच्या खात्यात जमा करावा तसेच खरीप हंगाम २०२५-२६ साठी आधारभूत धान खरेदी केंद्रांवर नोंदणीकृत सर्व शेतकºयांना हेक्टरी २० हजार रुपये धान बोनस देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसह विविध प्रश्नांवर भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत, जिल्हा भंडाराच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यात आले. मागण्या पंधरा दिवसांत पूर्ण न झाल्यास जिल्हाव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत उर्वरित पात्र शेतकºयांना दोन लाख रुपयांची प्रोत्साहन रक्कम देण्यात यावी, शेतीपंपासाठी अर्ज केलेल्या शेतकºयांना तातडीने वीज जोडणी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच जंगली प्राण्यांमुळे होणाºया पिकांच्या नुकसानीत माकडांमुळे होणारे नुकसान समाविष्ट करून पंचनामा व निश्चित कालावधीत भरपाई देण्यात यावी. अस्वल, रानडुक्कर, मधमाश्या व अन्य वन्यप्राण्यांमुळे होणाºया जीवितहानीचीही शासनाने दखलघेऊन त्याचा वन कायद्यात समावेश करावा, अशी मागणी किसान संघाने केली.

धान व इतर पिकांची कापणी, बांधणी व मळणी यासह शेतमजुरांची कामे जीआरएएमजी योजनेत समाविष्ट करावीत. वैनगंगा नदीवर उपसा सिंचन प्रकल्प उभारून त्याचा लाभ साकोली तालुक्यातील शेतकºयांना द्यावा. पांदण रस्ते योजनेअंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागातील पांदण रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून अतिक्रमणे हटवावीत. नगरपरिषद हद्दीतील शेतजमिनींसाठी जीआरएएमजी योजनेतून पांदण रस्ते तयार करावेत तसेच नगरपरिषद क्षेत्रात दरवर्षी आमसभा घेण्यात यावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. पत्रकार परिषदेला जिल्हा मंत्री दिनेश कापगते, जिल्हा कोषाध्यक्ष मधुकर कापगते, भास्कर चिरवतकर, वामन कापगते, मुकेश बावणे, सुरेश हरीणखेडे, एकनाथ दोनोडे, सूर्यभान निर्वाण, गिरीधारी लांजेवार, दीपक कापगते, सतीश मानकर, इंद्रायणी कापगते, माया टेंभुर्णे, रजनी करंजेकर व ईश्वर नागपुरे उपस्थित होते. मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शेतकºयांना दिलासा द्यावा; अन्यथा पंधरा दिवसांनंतर जिल्ह्यात व्यापक आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा भारतीय किसान संघाने दिला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *