‘माझी शाळा, माज्या सुविधा’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विशेष शाळा भेट कार्यक्रम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ, सुलभ आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी शाळा, माज्या सुविधा’ हा विशेष शाळा भेट व पायाभूत सुविधा आढावा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम जिल्हाधिकारी सावनकुमार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांच्या संकल्पनेतून व आदेशान्वये आयोजित करण्यात आला आहे. उपक्रमांतर्गत दिनांक १ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नियुक्त अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यातील शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन उपलब्ध पायाभूत सुविधा आणि शालेय व्यवस्थेची पाहणी करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सुरक्षित शालेय इमारत, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृहे, वीज, दिव्यांगस्नेही व्यवस्था, स्वच्छ परिसर आणि आवश्यक शैक्षणिक साधनांची उपलब्धता महत्त्वाची असते. शाळांमधील सुविधांची सद्यस्थिती वस्तुनिष्ठपणे जाणून घेणे, सुविधांमधील कमतरता निश्चित करणे आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *