भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : राज्याच्या उपराजधानीचा दर्जा असलेल्या नागपूरला ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकासित करण्यात येत आहे. त्यासाठी हजार कोटींच्या जवळपास निधी मिळणार आहे. परंतु विकासाच्या नावावर शहराचा पार बोजवारा वाजल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याचे चित्र शहरात दिसून आले. पावसाच्या पाण्याच्या निचºयासाठी रस्त्याच्या कडेला पावसाळी नाल्या तयार करण्यात आल्यात. परंतु या नाल्यांची स्वच्छताच झाली नसल्याचे अधोरेखित झाले. त्यामुळे पाणी रस्त्यावरच राहत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे असून त्यात साचलेल्या पाण्यामुळे ते दिसत नाही. त्यामुळे वाहन चालकांना मोठाच त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या उदासीनतेचा फटका सामान्य नागरिकांना यंदाही बसणार असल्याचे दिसून येत आहे. याचा वाहन चालकांना मोठा त्रास होतो.
नागरिकांच्या त्रासाकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याची टीका होत आहे. गेल्या दीड, दोन दशकात शहरातील सर्वच डांबरी रस्त्यांचे रूपांतर सिमेंट रस्त्यात करण्यात आले आहे. त्यातही गेल्या दशकभरात या रस्त्यांना प्राधान्य देण्यात आले. रस्त्यांच्या बाजूला कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळी नाल्याही तयार करण्यात आल्या. यामुळे रस्त्यावर पाणी राहणार नाही आणि नागरिक, वाहन चालकांना पावसाळ्यातील त्रासापासून सुटका मिळेल, असा दावा सत्ताधारी व प्रशासनाकडून करण्यात आला होता. परंतु सत्ताधाºयांना प्रशासनाकडून देखभालीसाठी साथ मिळत नसल्याचे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून दिसते. त्यामुळे वाहन चालकांसोबत पादचाºयांना त्रास होतो. पाणी वाहून नेणाºया नाल्याच कचरा, माती, गिट्टीने भरल्या आहेत. त्यामुळे पाणी वाहून न जाता रस्त्यावरच असते. नाल्यांमध्ये कचरा, माती साचते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची सफाई होणे आवश्यक आहे. सफाईची जबाबदारी ही महापालिकेची आहे. परंतु ती त्यांच्याकडून होताना दिसत नाही. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.
अॅड. राहुल झांबरे म्हणाले की, जोरदार पाऊस झाला की पाणी रस्त्यावरच साचते. यामुळे वाहन चालवताना त्रास होतो. विशेषत: रात्रीच्या वेळेस अपघाताचा धोका उद्भवतो. त्यामुळे पाणी रस्त्यावर जमा राहता कामा नये, याची व्यवस्था महापालिकेने करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. उमेश गेडाम नामक नागरिक म्हणाले की, ह्यरस्त्यावर आधीच अनेक ठिकाणी खड्डे आहेत. पावसाळ्यात पाणी त्यात साचते. त्यामुळे खड्डे दिसत नाहीत. यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रशासनाने खड्डे बुजवण्यासोबतच पाणी रस्त्यावर राहणार याचीही व्यवस्था केली पाहिजे. १५०० किमीच्या पावसाळी नाल्या महापालिका हद्दीत १५०० ते १६०० किमीच्या या नाल्या असल्याची माहिती आहे.
प्रशासनाकडून नाग नदी, पोहरा आणि पिवळी नाद्यांमधील गाळ काढण्याची कारवाई दरवर्षीच करण्यात येते. यावर कोट्यवधींचा खर्च होतो. नाल्यावरील चेंबरची झाकणे तुटली आहेत. यातून कचरा नाल्यात शिरते. परंतु या नाल्याची स्वच्छता नियमित होत नाही. तुटलेले चेंबर बदलले जात नाही. परिणामी, साचलेल्या कचºयाने पावसाळी नाल्या तुंबल्या आहेत. स्वच्छता केवळ औपचारिकता झाली असून कागदावर असल्याचे चित्र आहे. अयोध्यानगर ते महाकाळकर इमारतीपर्यंत तसेच तुकडोजी पुतळा ते मानेवाडा चौकापर्यंतच्या पावसाळी नाल्याची स्थिती बघितल्यास ते स्वच्छच झाल्या नसल्याचे दिसून येत आहे. असे चित्र शहराच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात आहे.