राज्यातील खासगी डॉक्टरांचा सोमवारचा संप तात्पुरता स्थगित

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : डोंबिवलीत पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नगरसेवक रमेश सुकºया म्हात्रे यांनी बेदम मारहाण केली होती. आरोग्य व्यवस्थेवरील हा हल्ला असून त्याचा निषेध आणि म्हात्रेंवर कठोर कारवाईसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्यभरातील शाखांनी सोमवार ते मंगळवार २४ तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेंसह दांडगट समर्थकांचा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेला जामीन शनिवारी रद्द केला. म्हात्रेंना रविवारी संध्याकाळपर्यंत पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याचे निर्देश दिले. याचवेळी न्यायालयाने ‘आयएमए’ ने आपला सोमवारचा बंद मागे घ्यावा, असे आवाहन केल्याने न्यायालयाच्या सूचनेचा मान ठेऊन हा बंद आम्ही तात्पुरता स्थगित करत आहोत, असे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेने म्हटले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *