एसटी तोट्यात तर नोकरी धोक्यात, कामचुकार अधिकाºयांना इशारा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. उत्पन्न वाढवण्यात अपयशी ठरणाºया आणि कामात निष्काळजीपणा करणाºया अधिकाºयांवर थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाºयांना एका महिन्याचा अल्टिमेटम देत, कामगिरीत सुधारणा न झाल्यास बदली, पदावनती किंवा निलंबनाची कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.एसटी ही ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची वाहतूक सेवा असल्याने, केवळ कागदोपत्री नियोजन न करता प्रत्यक्ष जमिनीवर परिणाम दिसणे आवश्यक असल्याचे मंत्री सरनाईक यांनी अधिकाºयांना सुनावले आहे.

बैठकांपुरते काम न ठेवता उत्पन्नवाढीसाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. एप्रिल-मे या महत्त्वाच्या हंगामात भाडेवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न वाढ न झाल्याने मंत्री सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. साधारणत: या कालावधीत एसटीला मोठा नफा मिळतो, मात्र यंदा परिस्थिती उलट असल्याचे समोर आले आहे. राज्यातील ३१ एसटी विभागांपैकी तब्बल २१ विभाग सध्या तोट्यात असल्याची माहिती समोर आली आहे. गर्दीच्या काळातही तोटा होत असल्याने महामंडळाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक आगार, विभाग आणि मुख्यालयातील अधिकाºयांच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन केले जाणार आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *