रामजी गणेशा शाळेच्या सिमेंट रस्त्यावर मुरूम टाकल्याने चिखलाची ‘खिचडी’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : शहरातील माकडे नगर येथील नगरपरिषदेच्या रामजी गणेशा प्राथमिक शाळा परिसरात प्रशासकीय निष्काळजीपणा आणि कंत्राटदाराच्या थातूरमातूर कारभाराचा मोठा फटका चिमुकल्या विद्यार्थ्यांना बसत आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वी शाळेच्या परिसरात तब्बल १० ते १५ ट्रॅक्टर मुरूम टाकण्यात आला, मात्र ऐन पावसाळ्यात घेतलेल्या या अजब निर्णयामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखलाची भयंकर ‘खिचडी’ झाली आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मार्गच उरलेला नाही.

सिमेंटच्या रस्त्यावर मुरूम!

संतापजनक बाब म्हणजे, शाळेत जाणाºया ज्या मार्गावर मुरूम टाकण्यात आला, तो रस्ता आधीपासूनच सिमेंटरीकरणाचा रस्ता होता. सदर सिमेंट रस्त्यावरच मुरूम ओतण्याचा अजब प्रकार येथे घडला आहे. पावसाळ्यात सिमेंट रस्त्यावरील मुरुमाचा संपूर्ण चिखल झाल्याने मुलांचे पाय घसरून पडण्याचे आणि कपडे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. नगरपरिषद प्रशासनाने ऐन पावसाळ्यात मुरूम टाकल्याने काय परिस्थिती निर्माण होईल, याची साधी शंकाही न बाळगल्याने नागरिकांमधूनतीव्र संताप व्यक्त होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *