विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना जीवदान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तुमसर तालुक्यातील येरली गावात रविवारी (६ जुलै) सकाळी घडलेल्या एका घटनेने गावकºयांमध्ये मोठी खळबळ उडाली. स्थानिक शेतकरी पटले हे सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात गेले असता, शेतातील विहिरीत काहीतरी हालचाल होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जवळ जाऊन पाहिल्यानंतर विहिरीत बिबट्याची दोन लहान बछडे पडल्याचे त्यांना दिसले. शेतात गेलेल्या शेतकºयाच्या निदर्शनास हा प्रकार आला. परिसरात मादी बिबट असण्याच्या भीतीने शेतकºयाने तातडीने आरडाओरड करून या घटनेची माहिती गावातील नागरिकांना व वनविभागाला दिली.

विहिरीत बिबट्याची पिल्ले पडल्याची बातमी गावात वाºयासारखी पसरताच, घटनास्थळावर बछड्यांना पाहण्यासाठी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. घटनेचे गांभीर्य ओळखून माहिती मिळताच वन विभागाचे पथक रेस्क्यू साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बछडे अत्यंत लहान असल्याने आणि विहिरीत पाणी असल्याने त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हे वन कर्मचाºयांसमोर एक मोठे आव्हान होते. मात्र, वन विभागाने कोणतीही घाई न करता अत्यंत संवेदनशीलतेने त्या पिल्लांना वाचविण्याची मोहीम हाती घेतली. वन विभागाच्या कर्मचाºयांनी विहिरीत विशेष जाळी टाकून अत्यंत काळजीपूर्वक दोन्ही पिल्लांना वर ओढले. विहिरीबाहेर काढल्यानंतर वन विभागाच्या वैद्यकीय पथकाद्वारे त्यांची प्राथमिक प्रकृती तपासण्यात आली.

दोन्ही बछडे सुखरूप असून सध्या ते वन विभागाच्या सुरक्षित ताब्यात आहेत. हे बछडे खूपच लहान असल्याने त्यांना त्यांच्या आईची म्हणजेच मादी बिबट्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे वन विभागाने आता या परिसरात मादी बिबट्याचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली असून, लवकरच या बछड्यांना त्यांच्या मादीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्यात येईल, अशी माहिती वन अधिकाºयांनी दिली. दोन्ही बछडे मादीपासून भरकटल्याने त्यांची आई आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनविभागाने नागरिकांना सतर्क राहाण्याचा इशारा दिला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *