-
नाना पंचबुद्धे
-
आर्थिक शिस्त व पारदर्शक कारभारामुळे बँकेची आर्थिक स्थिती भक्कम; ३ टक्के लाभांश देण्याची घोषणा
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
भंडारा : दि भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबर रोजी लक्ष्मी सभागृह, जे.एम. पटेल कॉलेजसमोर, भंडारा येथे बँकेचे अध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सभेला बँकेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्यने उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी देशातील दिवंगत मान्यवर व्यक्ती तसेच बँकेच्या दिवंगत सभासदांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
ठेवी ५०६ कोटींवर
सभेत बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा सादर करण्यात आला. सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांच्या सहकार्यामुळे मार्च २०२६ अखेर बँकेच्या ठेवी ५०६.१४ कोटी रुपये, तर कर्जवाटप ३२९.५६ कोटी रुपये झाले आहे. बँकेचा सीडी रेशो ६५.११ टक्के असून नेट एनपीए शून्य टक्के आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेला १.०३ कोटी रुपयांचा ንफ्य (नफा) झाला आहे, त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे सभेत स्पष्ट करण्यात आले.
सभेत मार्च २०२५ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक, तसेच बारावीच्या परीक्षेत ८५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या पाल्यांचा आणि क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या सभासदांच्या पाल्यांचा प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
आधुनिक बँकिंग सुविधांवर भर ग्राहकांना जलद व आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बँकेचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे, आरटीजीएस, एनईएफटी, एटीएम कार्ड, मोबाईल बँकिंग, युपीआय आणि आयएमपीएस यांसारख्या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने बँकेचा डेटासेंटर व डीआर साइट कलाऊडर स्थलांतरित करण्यात आल्या असून, ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर एरही कार्यान्वित करण्यात आले आहे.
पुढील वर्षी अधिक लाभांश देण्याची ग्वाही
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये झालेल्या नफ्यातून सभासदांना ३ टक्के लाभांश वितरित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सभासद, ग्राहक आणि कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे आगामी आर्थिक वर्षात बँकेच्या नफ्यात वाढ होईल आणि भविष्यात सभासदांना यापेक्षा अधिक लाभांश देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही अध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे यांनी दिली.
यावेळी माजी खासदार तथा आमदार मधुकर कुकडे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, उपाध्यक्ष प्रदीप पडोळे, नगराध्यक्षा मधुरा मदनकर, जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विलास शेंडे, किसान संघटनेचे अध्यक्ष माधवराव धोटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या यशस्वी आयोजनासाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश मदन, व्यवस्थापक व्ही.एस. भोंगडे, पी.डी. पाटील, एल.डी. मुलतानी, सी.जी. नखदेवे, एस.टी. शिवरकर, ए.बी. बचरे तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. सभेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल संचालक हेमंत महाफाळकर यांनी उपस्थितीचे आभार मानले.