सहकार क्षेत्राला आधुनिक व सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार : खा. राजेंद्र जैन

गोंदिया सहकारी शेतकरी खरेदी-विक्री समितीची आमसभा संपन्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
गोंदिया : गोंदिया येथील वैभव लॉन येथे गोंदिया सहकारी शेतकरी खरेदी-विक्री समिती लिमिटेड, गोंदियाच्या वतीने आयोजित आमसभेला खासदार राजेंद्र जैन यांनी उपस्थित राहून संचालक मंडळ, पदाधिकारी व सभासदांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सहकार क्षेत्र अधिक मजबूत, आधुनिक व सक्षम करण्यासाठी आगामी काळात सातत्याने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

खासदार राजेंद्र जैन म्हणाले की, सहकारी संस्था या शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. बदलत्या काळानुसार सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून अधिक सक्षम व सुदृढ होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा केंद्रबिंदू ठेवून सहकार क्षेत्राला अधिक प्रभावी व आदर्श स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

संस्थेच्या संचालक मंडळावर व पदाधिकाऱ्यांवर सभासदांनी व्यक्त केलेला विश्वास ही मोठी जबाबदारी आहे. सभासदांचा हा विश्वास कायम राखत संस्थेला प्रगतीचा मार्गावर नेणे ही संचालक मंडळाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही खासदार जैन यांनी नमूद केले. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा व आर्थिक आधार उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आमसभेला अध्यक्ष कैलास चंद्र हरिनखेडे, उपाध्यक्ष पन्नालाल सहारे, दीपक कदम, केतन तुरकर, संजय टेंभरे, संचालक चैनलाल धामडे, उमेद्र भेलावे, राहुल यादव, मंगल ठाकरे, योगेश तुरकर, महेंद्र कटारे, वजीर बिसेन, रामराज खरे यांच्यासह संचालक मंडळाचे पदाधिकारी, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *