सिहोरा येथे मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा; पोलिसांचा चोख बंदोबस्त

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : आज २६ आॅगस्ट रोजी सिहोरा येथे मोहम्मद पैगंबर यांचा १५०१ वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सिहोरा व परिसरातील मुस्लिम बांधव एकत्र येऊन एकतेचा परिचय दिला. यात लहान मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. ठिकठिकाणी व चौका चौकात मिठाई, सरबत व बिस्किट वाटप करण्यात आले. सकाळी ९ वाजता इंतेजामिया कमिटी मस्जिद मदरसा सिहोरा येथे एकत्र येऊन ढोल, ताशा, संदल व लाऊड स्पीकरच्या गजरात रॅली काढण्यात आली होती. मस्जिद मदरसा बाजार चौक, गोबरवाही फाटा, बसस्थानक ते बँक आॅफ इंडिया मार्गे गुजरी चौकातून मस्जिद मदरसा येथे येऊन रेलीचे समापन करण्यात आले. मज्जिद मदरसा लाल चौकात समापन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना मोहम्मद पैगंबर जन्मोत्सव सोहळ्याच्या शुभेच्छा देत सोहळा शांततेत पार पाडल्या बाबद तसेच हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन एकतेच परिचय दिल्याबद्दल व हिंदू मुस्लिम एकता, शांतता आणी बंधु भाव कायम राहावा असे आवाहनही करण्यात आले. मोहम्मद पैगंबर जन्मोत्सव सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मस्जिद मदरसा इंतेजामिया कमिटीचे सर्व पदाधिकारी व मुस्लिम बांधवांनी अथक परिश्रम घेतले. तर पोलीस स्टेशन सिहोराचे पोलीस निरीक्षक विजय कसोधन हे आपल्या पोलीस ताफ्यासह पाळत ठेवुन होते हे इथे उल्लेखनीय आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *