
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील मौजा एकोडी येथे कृषी व गावठाण वीज फिडर विभक्तीकरणाच्या प्रस्तावावर आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकºयांनी तीव्र विरोधाची भूमिका घेत प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला. भंडारा जिल्हाधिकारी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हजारो शेतकरी व नागरिकांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. नेपाल रंगारी यांनी ‘प्रथम सिंचन व्यवस्था उपलब्ध करून द्या, त्यानंतरच कृषी फिडर वेगळे करण्याचा विचार करा’ अशी ठाम भूमिका मांडली. सिंचनाची सुविधा उपलब्ध न करता कृषी फिडर विभक्त करण्याचा कोणताही प्रयत्न शेतकºयांना मान्य नसून जबरदस्ती झाल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
एकोडी सब-स्टेशन अंतर्गत गावठाण आणि कृषी वीज फिडर स्वतंत्र करण्याच्या प्रस्तावासंदर्भात आयोजित बैठकीला उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई, तहसीलदार निलेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी विसापूरे, सरपंच संजय खोब्रागडे यांच्यासह परिसरातील हजारो शेतकरी व नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी सावंतयांनी राज्य शासनाच्या धोरणाची माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रात कृषी फिडर विभक्तीकरणाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून एकोडी विभागातील काम अद्याप प्रलंबित आहे.
वरिष्ठ प्रशासकीय स्तरावरून या कामासाठी सातत्याने पाठपुरावा होत असल्याने हे काम पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यावर शेतकरी प्रतिनिधी म्हणून बोलताना डॉ. नेपाल रंगारी यांनी प्रशासनाच्या प्रस्तावाला जोरदार विरोध दर्शविला. “महाराष्ट्रातील बहुतांश भागात शेतकºयांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र एकोडी परिसरातील शेतकरी आजही केवळ पावसावर अवलंबूनआहेत. अशा परिस्थितीत कृषी फिडर वेगळे करणे म्हणजे शेतकºयांवर अन्याय ठरेल,” असे ते म्हणाले. डॉ. रंगारी यांनी पुढे धारगाव टप्पा-२ तसेच बोदलकसा येथून चोरखंबरा परिसरापर्यंत पाणी पोहोचल्याचा उल्लेख करत, केवळ १५ ते २० किलोमीटर कालवा उभारल्यास एकोडी परिसरातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते, असे सांगितले.
“एकदा शेतकºयांना पाणी मिळाले, शेतीला आधार मिळाला, तर कृषी फिडर विभक्तीकरणास आम्ही स्वत: पुढाकार घेऊ. परंतु तोपर्यंत आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, प्रसंगी जीव गेला तरी चालेल; पण शेतकºयांच्याहिताविरोधात कृषी फिडर वेगळे होऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडताच उपस्थित शेतकºयांनी जोरदार समर्थन दिले. बैठकीदरम्यान अनेक शेतकºयांनीही सिंचनाविना कृषी फिडर विभक्तीकरणामुळे शेतीचे मोठे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली. “वीज पुरवठ्याचे नियोजन करण्यापूर्वी पाण्याचा प्रश्न सोडवा” अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
शेतकºयांच्या भावना व मागण्यांची दखल घेत जिल्हाधिकारी सावंतकूमार यांनी एकोडी परिसरासाठी सिंचनाच्या पयार्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच शेतकºयांच्या हिताला प्राधान्य देत प्रशासन सकारात्मक भूमिका घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, एकोडी परिसरातील शेतकरी संघटना व ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, सिंचनाचा प्रश्न निकाली न काढता कृषी फिडर विभक्तीकरणाचा निर्णय लादण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल. त्यामुळे आता प्रशासन शेतकºयांच्या मागण्यांकडे कितपत गांभीयार्ने पाहते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.