भंडारा शहरातील ट्युशन क्लासेस आणि रुग्णालयांची मुख्याधिकाºयांकडून पाहणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरात मोठमोठया इमारती बांधून ट्युशन क्लासेस घेणाºया व रुग्णालय उभारणाºया अनेकांवर आज भंडारा नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांनी कारवाईचा बडगा उगारला. प्रत्यक्ष अशा ठिकाणांची पाहणी करून त्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश देत, ताबडतोब कारवाई करण्याच्या सूचना मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी दिल्या. फायर एक्झिट, वाहनतळ्याची व्यवस्था, बांधकामाच्या नसलेल्या परवानग्या अशा अनेक त्रुट्या आढळून आल्याचे मुख्याधिकाºयांनी सांगितले. लखनऊ येथील ट्युशन क्लासेस मध्ये झालेले अग्निकांड आणि त्यात १५ बालकांचा गेलेला जीव अत्यंत वेदनादायी आहे. त्यामुळे भंडारा नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांनी घेतलेली ही भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे.

भंडारा शहरातील ट्युशन गल्ली परिसरातील मलन टॉवर, स्पार्क क्लासेस, गिरेपुंजे इंग्लिश क्लासेस, महाकाळकर फिजिक्स क्लासेस, आयडियल मस्त अकॅडमी, कॅटलायझर क्लासेस, शिक्षा क्लासेस अशा विविध मोठमोठ्या ट्युशन क्लासेसची स्वत: मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाली यांनी पाहणी केली. परवानगी आहे का, असल्यास परवानगी प्रमाणे बांधकाम झाले आहे का? फायर एक्झिट पुरेशी मोकळी जागा अशा सर्व बाबी तपासण्यात आल्या. यावेळी अनेक ठिकाणी फायर एक्झिट ची व्यवस्था नसल्याचे स्पष्ट होताच ताबडतोब नोटीस देण्यात आली. काही ठिकाणी नसलेली वाहनतळाची व्यवस्था, परवानगी पेक्षा वेगळे झालेले बांधकाम अशाही तृट्या आढळून आल्या. पुढील सात दिवसाच्या आत नमूद त्रुटया दूर कराव्या अन्यथा विद्युत आणि पाणीपुरवठा खंडित केला जाईल, असे नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.

उच्च विद्युत दाबाच्या वाहिनीच्या खाली करण्यात आलेल्या एका रुग्णालय बांधकामाची पाहणी यावेळी करण्यात आली. हे बांधकाम अनधिकृत असून, पूर्वीच नोटीस देण्यात आली होती. या बांधकामावर कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी दिले. त्यांच्यासोबत नगर रचना अधिकारी पवन कनोजे, समीर गणवीर व अन्य नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *