गडकुंभली-साकोली येथील हृदयद्रावक घटना
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
गोंदिया :- अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याचा डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गडकुंभली, साकोली येथे घडली. मयूर युवराज ब्राम्पणकर (रा. पिंपळगाव-खांबी, ता. अर्जुनी/मोरगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे, या घटनेमुळे पिंपळगाव-खांबीसह परिसरावर शोककळा पसरली आहे. पिंपळगाव-खांबी येथील एका नागरिकाच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम गडकुंभली, साकोली येथील डोहावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी बारावीचा विद्यार्थी मयूर ब्राम्पणकरदेखील कुटुंबीय आणि नागरिकांसोबत गेला होता. अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम सुरू असताना
डोहातील पाणी पाहून मयूर आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, डोहातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने मयूर अचानक पाण्यात बुडाला. ही बाब लक्षात येताच सोबत असलेल्या नागरिकांनी त्याला वाचण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. मात्र मयूर पाण्यात बुडाला या घटनेची माहिती संबंधित यंत्रणेला देण्यात आल्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. अथक પ્રયनांनंतर मयूरचा मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात आला. त्याच्या अकाळी मृत्यूची बातमी समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
मयूरच्या मित्रमंडळी, शिक्षक, नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. बारावीचे शिक्षण घेत असलेल्या मयूरच्या उज्ज्वल भवितव्याबाबत कुटुμβीय आणि मित्रांनी अनेक स्वप्ने पाहिली होती. मात्र, काळाने त्याच्यावर घाला घालत त्याचा अकाली जीव घेतल्याने संपूर्ण पिंपळगाव-खांबी परिसर सुन्न झाला आहे.