आज होणार बाप्पांचे आमगन…

 

■ ढोल-ताशांचा गजर, गणेशभक्तांमध्ये उत्साह ■ पुढील दहा दिवस बाप्पांचा भंडारेकरांना पाहुणचार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
भंडारा : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लाडक्या गणरायाचे सोमवारी, १४ सप्टेंबर रोजी भंडारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आगमन होणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषाने शहरातील गल्लीबोळ आणि सार्वजनिक मंडळांचे परिसर दुमदुमणार असून, ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतीच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, मखर, मंडप तसेच पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेतही मोठी लगबग पाहायला मिळत आहे. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी भक्तांमध्ये विशेष उत्साह असून, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण बाप्पाच्या स्वागतासाठी आतुर झाले आहेत.

यंदाही विविध सार्वजनिक गणेश मंडळांकडून सामाजिक, धार्मिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक मंडळांनी आकर्षक देखावे उभारण्याची तयारी केली असून, काही ठिकाणी सामाजिक संदेश देणाऱ्या संकल्पनांवर आधारित सजावटी करण्यात येणार आहेत. घरगुती गणपतीसाठीही नागरिकांनी पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य दिले आहे.

सोमवारी सकाळपासूनच गणेशमूर्तीची मिरवणूक, ढोल-ताशा पथकांचा गजर आणि बाप्पाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय होणार आहे. शुभमुहूर्तावर विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यानंतर पुढील दहा दिवस भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक मंडळांच्या मंडपात बाप्पांचा पाहुणचार होणार असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी गणेशोत्सवाची रंगत वाढणार आहे.

गणेशोत्सव शांतता, उत्साह आणि सामाजिक सलोखा राखत साजरा करण्यासाठी प्रशासन व पोलिस यंत्रणेकडून्ही आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

नागरिकांनी उत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणपूरक पद्धतीने आणि सामाजिक बांधिलकी जपत गणरायाचे स्वागत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *