लाखनी : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार डॉ. परिणय रमेश फुके यांनी आज लाखनी येथेआपला मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही व्यवस्थेत मतदानाला अनन्यसाधारण महत्त्व असून, प्रत्येक पात्र मतदाराने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सुधाकर विठ्ठलराव कोहळे निवडणूक रिंगणात आहेत.आमदार डॉ. परिणय फुके यांनी लाखनी येथील समर्थ विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, स्थानीय कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.
पदवीधर मतदारसंघ हा शिक्षित मतदारांच्या अपेक्षा आणि प्रश्नांना प्रतिनिधित्व देणारा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. शिक्षण, रोजगार, युवकांचे प्रश्न आणि पदवीधरांच्या विविध मागण्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येक पात्र पदवीधर मतदाराने मतदान करून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी घनश्याम पाटील खेडिकर, श्रावणजी कपगते, शेषराव वंजारी, बब्लुजी निंबेकर, सुधाकर हटवार, महेश आकरे, पद्माकर बावनकर, आल्हाद भांडारकर, श्रीकांत धुसारी, गिरीश बावनकुळे, अश्विन धरमशहरे, आदित्य बाते, राजेशजी बाते, वसंत कुंभारे, भूषण गिरेपुंजे, सचिन घातबंधे, खुमेश बोपाचे, मनीय वंजारी, किशोर वाघाye, धुमेश ढेंगे, कोमल दादा गाभाने, शिवराम गिरेपुंजे, डॉ. सुदाम सहारे, डॉ. शाम शिंगरे, म. वा. बोलणे, सारिका ताई बसीशंकर, उमेश गायधनी, शुभम मेंढे, लोकेश लांजेवार, संदीप भांडारकर, सत्यवान वंजारी, ॲड. होमेश्वर रोकडे आणि दिनेश वंजारी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.