एसटीमधून उतरल्यानंतर रस्ता ओलांडणाºया विद्यार्थिनीला स्कॉर्पिओची धडक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा – रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील सातोना गावातील चौकात गुरुवारी सकाळी हृदयाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. एसटी बसमधून उतरून रस्ता ओलांडत असलेल्या सातवीच्या विद्यार्थिनीला भरधाव वेगाने येणाºया स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की विद्यार्थिनी हवेत उडून काही अंतरावर रस्त्यावर फेकली गेली. या भीषण अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयात विद्यार्थिनीला स्कॉर्पिओची धडक कैद झाली असून, हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येत आहे. जखमी विद्यार्थिनीचे नाव माही झाडे असे असून ती भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयात इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

वेळेवर उपचार मिळाल्यामुळे सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी एसटीमधून उतरून रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओ चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि क्षणार्धात हा अपघात घडला. धडकेनंतर काही क्षण घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून मुलीला रुग्णालयात रवाना केले. या प्रकरणी वरठी पोलीस अधिक तपास करीत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताचे नेमके कारण आणि वाहनचालकाची जबाबदारी निश्चित केली जात आहे. दरम्यान, सातोना चौकात यापूर्वीही लहान-मोठे अपघात घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असतानाही वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी, झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर तसेच वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *