भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी :- सुरू असलेल्या जनगणणेत इतर मागासवर्गीयांचा स्वतंत्र कॉलम टाकून जनगणना करण्यात यावी याकरिता ओबीसी संघर्ष समिती भंडारा जिल्हा शाखा पवनीतर्फे राष्ट्रपती सुश्री द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महानिबंधक आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण,केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री भारत सरकार यांना तहसीलदार पवनी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. भारतात सामाजिक न्याय आणि सर्व समावेशक विषयाच्या धोरणाची आखणी करण्यासाठी जातीनिहाय जनगणनेची अचूक आकडेवारी असणे आवश्यक आहे.परंतु केंद्र सरकारने ओबीसी चे कलम वगळल्यामुळे इतर मागासवगीर्याचे ओपन एन्डेड स्वरूपात जात विचारण्याची पद्धत अवलंबविल्या जात आहे ज्यावर ओबीसी महासंघाचा आक्षेप आहे. सन २०११ मध्ये झालेल्या सामाजिक आणि आर्थिक जात निहाय जनगणनेत ओपन इंडेड प्रश्न विचारल्यामुळे देशभरातून तब्बल ४३ लाख ७० हजार अधिक जाती- पोटजातीचे नोंद झाली. उच्चार, स्पेलिंग, स्थानिक नावाच्या फरकामुळे मिळाल्या संपूर्ण डाटा सदोष ठरला आहे.आणि त्याचा इतर मागासवर्गीय विकासासाठी कोणताही उपयोग झालेला नाही.
जनगणने मध्ये ओबीसी साठी स्वतंत्र काला नसल्यामुळे देशातील खºया ओबीसी समाजाची लोकसंख्या व सामाजिक आर्थिक वास्तव्य कधीच समोर येणार नाही. याचा थेट परिणाम शिक्षण,रोजगार, देशाच्या बजेट आणि आरक्षणाच्या धोरणावर विपरीत परिणाम होईल हा इतर मागासवर्गीय समाजावर खूप मोठा अन्याय होईल त्यामुळे “ओबीसी समाजाचा स्वतंत्र कालम नसेल तर ओबीसीचा सहभाग नसेल ” इतर मागासवर्गीय समाजाच्या न्याय हक्कासाठी देशभरातील विविध विविध राज्यात असंतोष खदखद असून आंदोलन सुरू झालेले आहेत. केंद्र सरकारने तात्काळ जनगणनेच्या सदोष प्रश्नावलीत व पद्धतीमध्ये सुधारणा करून इतर मागासवगीर्यासाठी स्वतंत्र कॉलम कॉलम आणि ड्रॉप डाऊन यादी जाहीर करावी. या मागणीचा तात्काळ सकारात्मक विचार न झाल्यास संपूर्ण देशातील इतर मागासवर्गीय समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडल्या जाईल आणि आगामी जनगणनेवर बहिष्कार टाकण्यात येईल या आंदोलनामुळे व बहिष्करामुळे देशात निर्माण होणाºया परिस्थितीची सर्व जबाबदारी केंद्र सरकारची राहील असा इशारा दिला आहे. याप्रसंगी उमा देशमुख, प्रकाश पचारे, राम भेंडारकर,नितीन तलमले, शोभनाताई गौरशेट्टीवार, दिनकर बावनकर, विजय तलमले, रवी काटेकर, अरविंद काकडे, नरेश भिवगडे, प्रकाश रेहपाडे, विलास जिभकाटे,अंकुश देशमुख, विवेक चव्हाण,मनोहर मेश्राम, मनोहर कावळे, सुरेश बागडे,महेंद्र रेहपाडे,विनायक गाढवे,रघुनाथ नान्हे, आनंदराव बागडे,दिगंबर सहारे आदि उपस्थित होते.