जनतेच्या कामात लापरवाही करणाºया कर्मचाºयांची गय करणार नाही

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाच्या तक्रारी वरून जिल्हा परिषद वित्त विभाग कर्मचारी व शिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचारी चक्क कर्मचाºयांच्याच प्रश्नांना उलट सुलट उत्तर देत फिरवत असतील आणि १५ वर्षा पर्यंत प्रश्न सुटत नसतील तर जनसामान्यांचे प्रश्न सुटतील काय? यावर संताप व्यक्त करत अश्या लाफरवाह कर्मचाºयावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून कार्यवाही करू असा ईशारा जिल्हा परिषद अध्यक्षा कविता जगदीश उईके यांनी दिला आहे.

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने भंडारा जिल्हा अध्यक्ष धनंजय बिरणवार सरचिटणीस मदन मेश्राम, संघटनेचे नरेश भुरे, आणि अमोल जांभुळे यांनी जिल्हापरिषद अध्यक्ष कविता जगदीश उईके यांच्या दालनात जिल्हा परिषद भंडारा चे शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे कार्यालयात निवेदन देऊनही शिक्षण विभागातील कर्मचारी समाधानकारक उत्तर देत नसून फाईल कुठे आहे कुठे शोधू अशी उडवा उडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करत आहेत तर वित्त विभागातील कर्मचारी नवीन सॉफ्टवेअर मारला असल्याने आता जुना डाटा दिसत नाही असे उत्तर देत असल्यानं कर्मचाºयांचा २००५ पूर्वी पासूनचा निधी गेला कुठे असा प्रश्न संघटनेने वारंवार उपस्थित करून समाधान होत नसल्याने संघटनेने उपोषण किंवा आंदोलन करावे काय? असा प्रश्न उभा केल्या गेला.

या सभेत जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या बाबत चर्चा करून तात्काळ कार्यवाही करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले. त्या निवेदनात जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांमुळे संबंधित शिक्षक कर्मचारी यांना आर्थिक व मानसिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले मागील दहा ते बारा वर्षापासून शिक्षक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत जिल्ह्यात अनेक पद रिक्त असून शिक्षक हक्काच्या पदापासून वंचित आहे आणि इतरही समस्या पासून दुर्लक्षित आहेत. त्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी संघटनेने मागण्यासाठी सर्व प्रकारच्या शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रिया न्यायालयीन आदेशाच्या अधीन राहून तातडीने पूर्ण करण्यात याव्यात. डी.सी.पी.एस अंतर्गत जमा झालेली रक्कम संबंधित कर्मचाºयांच्या जी.पी.एफ खात्यामध्ये वर्ग करण्यात यावे.

नक्षलग्रस्त लाखनी, लाखांदूर व साकोली तालुक्यातील शिक्षकांचे अतिरिक्त थकीत घरभाडे भत्ता प्रकरण तातडीने निकाली काढून संबंधित शिक्षकांना देय रक्कम अदा करण्यात यावी. स्वग्राम भत्ता शिक्षकांना अदा करण्यात यावा. नक्षलग्रस्त भाग जसे की लाखनी, लाखांदूर व साकोली तालुक्यातील शिक्षकांचे अतिरिक्त थकीत घरभाडे भत्ता प्रकरण तातडीने निकाली काढून संबंधित शिक्षकांना देय रक्कम अदा करण्यात यावी.

स्वग्राम भत्ता शिक्षकांना अदा करण्यात यावा. अश्या मागन्यांचे निवेदन सादर करण्यात आले. सदर मागण्यासाठी अनेकदा निवेदन देऊनही सबंधित विभागात कार्यरत जिल्ह्यातील कर्मचारी उड- वाउडवीची उत्तरे देत असल्याची तक्रार संघटनेने केली तेव्हा जिल्हाध्यक्षा सौ. कविता उईके यांनी सबंधित विभागातील उपस्थित अधिकारी यांना बोलावून त्यांच्या समस्यांचे निराकारण केले. पण जिल्हा प्रशासनाचा धाक नाही काय? म्हणून प्रशासनातील संबंधित अधिकाºयांची सभा घेऊन उन्मत्त वर्तन करणाºया तसेच लाफरवाह कर्मचाºयांची गय केली जाणार नाही, संबंधित विभागातील अधिकारी व मुख्यकार्यकारी कार्यालयाकडून कार्यवाही करून कर्मचारी व जनतेच्या समस्यांचे निराकरण केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा अध्यक्ष धनंजय बिरणवार, उपाध्यक्ष मदन मेश्राम, कार्यालयीन सचिव अमोल जांभुळे, संघटनेचे नेते नरेश भुरे, गोपाल लांजेवार, मारोती मेश्राम, शिंदे, राजेंद्र रणदिये, मनीष जगणे, डोलीराम गिरीपुंजे, देवनात लांजेवार, विजय बागडकर, तसेच बरेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *