ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना ‘नरकयातना’ जबाबदार अधिकाºयांवर कारवाई करा!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : रेल्वे ओव्हरब्रिजच्या निकृष्ट दर्जाच्या आणि अत्यंत नियोजनशून्य कामामुळे कोथूर्णा ते इंदुरखा हा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद पडला असून स्थानिक नागरिकांना अक्षरश: ‘नरकयातना’ वर्षभरापासून भोगाव्या लागत आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अधिकारी आणि ठेकेदाराची हीच मनमानी इंदुरखा ते रोहना या मुख्य रस्त्यावरही पहायला मिळत असून, हा रस्ताही चुकीच्या नियोजनामुळे वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे. एकाच वेळी दोन-दोन महत्त्वाचे मुख्य रस्ते बंद झाल्याने संपूर्ण परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रस्ते बंद असल्याने शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.शेतमाल वेळेत बाजारात पोहोचवता येत नसल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना दवाखान्यात नेणे जिकिरीचे बनले आहे. शाळा-महाविद्यालयात जाणाºया विद्यार्थ्यांची दररोज अडवणूक होत आहे. निकृष्ट दर्जाची कामे करून जनतेचा जीव धोक्यात घालणाºया या ठेकेदारावर रेल्वे विभाग आणि ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजने’च्या अधिकाºयांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी लावून धरण्यात आली आहे. याबाबत बोलताना उमेश मोहतुरे यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. “जोपर्यंत काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण होत नाही, तोपर्यंत संबंधित ठेकेदाराची कोणतीही बिले मंजूर करू नयेत.

जनतेच्या पैशांची उधळपट्टी आणि निकृष्ट काम करणाºयांना अभय देणे प्रशासनाने त्वरित थांबवावे. या कामासाठी जबाबदार असणाºया अधिकाºयांचीही चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झालीच पाहिजे.” प्रशासनाला जनआंदोलनाचा इशारा संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाºयांच्या संगनमतामुळेच आज संपूर्ण परिसराला हा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन नागरिकांना लवकरात लवकर न्याय द्यावा, अन्यथा ‘तीव्र जनआंदोलन’ छेडले जाईल, असा थेट इशारा उमेश मोहतुरे व स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. एकीकडे पावसाची सतत पडझड सुरू असून अशातच रस्ता परिपूर्ण बंद होणे म्हणजे हे ठेकेदार मस्त आहेत यांना काही देणं घेणं नाही. सबंधित दोन्ही रस्त्यासाठी काम निकृष दर्जाचे आहे ते तपासण्यासाठी परिसरातील नागरिकांनी या अगोदर लेखी तक्रारी संबधीत कार्यालयात दिले आहेत. तरीपण कानाडोळा केला जातो.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *